IND vs WI 2nd Test: संधी मिळाल्यास रविचंद्रन अश्विन करू शकणार मुथय्या मुरलीधरन यांच्या 'या' जबरदस्त रेकॉर्डची बरोबरी

सध्या हा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. मुरलीधरनने 66 सामन्यांमध्ये 350 बळी घेतले. अश्विनला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट पूर्ण करण्यासाठी 8 विकेटची गरज आहे.

R Ashwin | File Image | (Photo Credits: PTI)

फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) हा सध्याच्या भारतीय संघाचा (Indian Team) सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरूद्ध त्याने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. विंडीज देखील एक प्रकारे त्यांचा आवडता विरोधी संघ आहे. आणि आता तो एका संधीच्या प्रतीक्षेत आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. आणि दुसर्‍या कसोटीत अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास तो विक्रम करू शकतो. टीम इंडियाने अश्विनचा पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. त्यामुळे चाहते आणि क्रिकेट तज्ञ चांगलेच निराश झाले होते. (Live Streaming of IND vs WI, 2nd Test Day 1: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर)

अश्विनला विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर तो सर्वात वेगवान 350 बळी घेण्याचा विक्रम नोंदवू शकतो. सध्या हा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांच्या नावावर आहे. मुरलीधरनने 66 सामन्यांमध्ये 350 बळी घेतले. अश्विनला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट पूर्ण करण्यासाठी 8 विकेटची गरज आहे आणि विंडीजविरुद्ध ही कामगिरी करता अश्विन संयुक्तपणे या विक्रमाची बरोबरी करू शकतो.

पहिल्या कसोटीत भारतीय संघाकडून खेळणारा एकमेव फिरकीपटू रवींद्र जडेजा होता. जडेजाने पहिल्या डावात अर्धशतक केले होते आणि सामन्यात 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या. अशा परिस्थितीत तो दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी टीमची पहिली पसंती राहील. पण जर खेळपट्टी कोरडी असेल तर भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाजांसह उतरू शकेल. अशा परिस्थितीत अश्विनला खेळण्याची संधी मिळू शकते. अश्विन विंडीजविरुद्ध आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 21.85 च्या सरासरीने 60 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने विंडीजविरुद्ध चार शतकेही ठोकली आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टेस्ट सामना खेळला होता.