IND vs WI 2nd Test: दुसर्‍या टेस्टमध्ये फक्त 1 विकेटसह इशांत शर्मा मोडणार कपिल देव यांचा 'हा' विश्वविक्रम, वाचा सविस्तर

30-वर्षीय इशांतने विंडीजविरुद्ध दुसर्‍या सामन्यात एक विकेट घेत आशियाबाहेरील भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. विंडीजविरुद्ध एक विकेट घेत शर्मा माजी कर्णधार कपिल देव यांचा विश्वविक्रम मोडेल.

इशांत शर्मा (Photo credit : youtube)

अँटिगामध्ये 318 धावांनी मिळवलेल्या प्रचंड विजयानंतर भारतीय संघ संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेप्रमाणे कसोटी मालिकेतही आता टीम इंडियाची नजर वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप करण्यावर आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील शेवटचा टेस्ट सामना शुक्रवार, 30 ऑगस्टपासून किंग्स्टन, जमैका येथे खेळला जाईल. दुसर्‍या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्यासमोर इतिहास रचण्याची उत्तम संधी असेल. 30-वर्षीय इशांतने विंडीजविरुद्ध दुसर्‍या सामन्यात एक विकेट घेत आशियाबाहेरील भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. शर्माने आशियाबाहेरील 45 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 155 विकेट्स घेतले आहेत. (IND vs WI 1st Test: टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सतत होणाऱ्या बदलांवर विराट कोहली याने केले 'हे' मोठे विधान)

शिवाय, विंडीजविरुद्ध एक विकेट घेत शर्मा माजी कर्णधार कपिल देव यांचा विश्वविक्रम मोडेल. देव यांनीदेखील आशियाबाहेरील सामन्यात 155 विकेट्स घेतले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. कुंबळेने आशिया बाहेरील सामन्यात एकूण २०० विकेट घेतले आहेत. या व्यतिरिक्त, वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या दोन विकेट्ससह इशांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याचा टप्पा देखील पूर्ण करेल.

हे आहेत आशियाबाहेर भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:

अनिल कुंबळे-200

कपिल देव-155

इशांत शर्मा-155

झहीर खान-147

बिशन सिंह बेदी-123

अँटिगा टेस्टच्या पहिल्या डावांत इशांतने टिच्चून मारा केला. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शर्मा यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. पहिल्या डावात शर्माने 43 धावा देऊन 5 गडी आणि दुसर्‍या डावात 31 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आतापर्यंत खेळलेल्या त्याच्या 91 सामन्यांमध्ये इशांतने 33.56 सह 275 खेळाडूंना पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif