IND vs WI 2nd T20I: पावसामुळे खेळात व्यत्यय; वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 27 चेंडूत 70 धावांची गरज

भारताने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत वेस्ट इंडिज संघाला 15.3 ओव्हरमध्ये 4 बाद 98 केल्या आहेत. वेस्ट इंडिज संघाला 27 चेंडूत 70 धावांची गरज आहे.

(Photo Credits: Getty Image)

भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला. भारताने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत वेस्ट इंडिज संघाला 15.3 ओव्हरमध्ये 4 बाद 98 केल्या आहेत. वेस्ट इंडिज संघाला 27 चेंडूत 70 धावांची गरज आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने विंडीजसमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. टीम इंडियाची सलामीची जोडी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharm) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित-शिखरांची भागीदारी जमत असताना धवन 23 धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर रोहितने कर्णधार विराटचा साथीने संघाचा डाव सावरला. रोहितने याच सामन्यात आपापले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्यानंतर रोहित 67 धावा करून माघारी परतला.

रोहितच्या मागोमाग रिषभ पंत आणि नंतर कोहली देखील बाद झाले. पंत यंदाच्या संयत देखील प्रभावी खेळी करत अयशस्वी राहिला. त्याने 5 चेंडूत 4धावा केल्या. आणि नंतर मोठा शॉट मारण्याच्या नादात झेल बाद झाला. आजच्या सामन्यात भारताची फळी पुन्हा एकदा चांगली खेळी करू शकली नाही. रोहित आणि धवनच्या जोडीने 67 धावांची भागीदारी केली.

विंडीजची सुरुवात काही चांगली झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे टीमला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. एव्हिन लुईस शून्यावर बाद झाला. तर सुनील नारायण फक्त चार धावा करत माघारी परतला. निकोलस पूरण आणि रोव्हमन पॉवेल यांनी विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पूरण 19 धावा करून बाद झाला. कृणाल पंड्या याने पूरण आणि पॉवेल यांच्या भागीदारी मोडत संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला.