IPL Auction 2025 Live

IND vs WI 2nd T20I: डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे टीम इंडियाचा विजय, 22 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव; मालिकाही खिशात

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारतीय संघाने विजयासाठी विंडीज समोर 168 धावांचे आव्हान दिले होते. या विजयासह ३ सामन्याची मालिका देखील भारताने खिशात घातली आहे. शनिवारी झालेला सामन्यात भारताने 4 विकेट्स विजय मिळवला होता.

India National Cricket Team (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 22 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ३ सामन्याची मालिका देखील भारताने खिशात घातली आहे. शनिवारी झालेला सामन्यात भारताने 4 विकेट्स विजय मिळवला होता. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारतीय संघाने विजयासाठी विंडीज समोर 168 धावांचे आव्हान दिले होते. पावसाने अडथळा घातलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजला 15 ओव्हरमध्ये 4 बाद 98 धावाच करता आल्या. भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याची दे दणादण फलंदाजी पाहायला मिळाली. रोहितने भाराताल आक्रमक सुरुवात करून दिली. रोहितने शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या साथीने 67 धावांची भागीदारी केली. धवन 23 धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर देखील रोहितआक्रमक खेळी करत राहिला. रोहितने 51 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 67 धावांची महत्वाची खेळी केली. (IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग', ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल याला मागे टाकत T20 मध्ये रचला विश्वविक्रम)
रोहितच्या मागोमाग रिषभ पंत (Rishabh Pant) आणि नंतर कोहली देखील बाद झाले. पंत यंदाच्या संयत देखील प्रभावी खेळी करत अयशस्वी राहिला. त्याने 5 चेंडूत 4धावा केल्या. आणि नंतर मोठा शॉट मारण्याच्या नादात झेल बाद झाला. आजच्या सामन्यात भारताची फळी पुन्हा एकदा चांगली खेळी करू शकली नाही. रोहित आणि धवनच्या जोडीने 67 धावांची भागीदारी केली. आणि अखेरीस कृणाल पंड्या याच्या शेवटच्या ओव्हरमधल्या फटकेबाजीमुळे संघाला मोठी धाव संख्या उभारता आली. वेस्ट इंडिजसाठी शेल्डन कॉटरल आणि ओशन थॉमस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर किमो पॉल याला एक विकेट मिळाली.

भारतासाठी कृणाल पंड्या (Krunal Pandya) याने 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमार याने प्रत्येकी 1 गडी बाद केले. टीम इंडियाच्या आजच्या सामन्याचा नायक ठरला तो 'हिटमॅन' रोहित. या सामान्य हिटमॅन रोहितने 3 षटकार मारत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल (Chris Gayle) याचा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकारांचा विक्रम मोडीत काढला. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितने आजवर 107 तर गेलने 105 षटकार मारले आहेत.