IND vs WI 2nd ODI 2019: टॉस जिंकून टीम इंडियाचा बॅटिंगचा निर्णय, भारताच्या प्लेयिंग XI मध्ये कोणताही बदल नाही

आजच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणताही बदल नाही आहे.

विराट कोहली आणि रिषभ पंत (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणताही बदल नाही आहे. युवा खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात तयार आहे. भारत-विंडीजमधील दुसरा वनडे सामना आज रविवारी पोर्ट ऑफ स्पेन मैदानात रंगणार आहे. आजचा हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्न असेल. दुसरीकडे, भारतविरुद्ध वनडे मालिके ही ख्रिस गेल (Chris Gayle) याची अखेरची मालिका असणार आहे त्यामुळे विंडीज संघ देखील त्याला विजयी सलामी देऊन अलविदा करण्याच्या हेतूने खेळ करेल. (IND vs WI 2nd ODI मॅचआधी रिषभ पंत याने शेअर केला हॉटेलमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ, 'गर्लफ्रेंड' ईशा म्हणाली-मिस यू, पहा Video)

भारत-विंडीजमध्ये पहिला वनडे सामना 13 ओव्हरचा खेळवण्यात आला. याच सामन्यात गेल चार धावा करत बाद झाला. तर एविन लुईस याने नाबाद 40 धावांची खेळी केली. दरम्यान पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते. टीम इंडियाच्या मधल्या फळीची चिंता पंत आणि अय्यर सारखे युवा खेळाडू मिटवू शकतील अशी अपेक्षा केली जात आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात टी-20 पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच करता आल्या होत्या. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने तुफान फलंदाजी करत 65 धावा केल्या. आजचा सामना जिंकून टीम इंडियाकडे ३-सामन्याच्या मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्याने आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.

असा आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

टीम इंडिया: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि खालील अहमद.

वेस्ट इंडिज: ख्रिस गेल, एव्हीन लुईस, शे होप, निकोलस पुरन, शिमरोन हेटमायर, रोस्टोन चेस, जेसन होल्डर (कॅप्टन), कार्लोस ब्रॅथवेट, शेल्डन कॉट्रेल, केमार रोच आणि ओशाने थॉमस.