IND vs WI 2019: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात पुन्हा सुरु होणार रेस, वर्षाखेरीस कोण राहणार No 1 'हिटमॅन' की 'किंग कोहली'?
ही लढाई कोण जिंकेल, रोहित की विराट हे पाहणे फारच रंजक ठरेल. रोहित आणि विराट या दोघांनी आजवर 22-22 अर्धशतकं ठोकली आहेत, रोहित टी-20 स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या प्रकरणात कोहली दुसर्या क्रमांकावर आहे.
भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) वर्षाच्या शेवटच्या मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेत टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडीजशी (West Indies) होईल, ज्यांना त्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये विंडीजमध्ये खेळताना पराभूत केले होते. त्यामुळे, संघ पूर्ण आत्मविश्वासाने मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. शिवाय, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हेदेखील संघाचा भाग आहे. विश्वचषकनंतर विराट आणि रोहित याच्या संबंधात फरक पडल्याचा म्हटले जात होते. पण, जेव्हा जेव्हा विराट शतक ठोकतो तेव्हा रोहित त्याचे अभिनंदन करतो आणि रोहित जेव्हा धावा करतो तेव्हा कोहली आनंदाने भारावून जातो. पण दोघांमध्येही धावा करण्याची स्पर्धा असतेच, सध्या विराट आणि रोहित दोघेही बरोबरीवर आहेत. आणि 6 डिसेंबरपासून या दोघांमध्ये जोरदार लढत होणार आहे. ही लढाई कोण जिंकेल, रोहित की विराट हे पाहणे फारच रंजक ठरेल. (ICC Test Rankings: स्टिव्ह स्मिथ याला पछाडत विराट कोहली टेस्टमध्ये पुन्हा बनला नंबर 1 फलंदाज; मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा Top 10 मधून आऊट)
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकेला 6 डिसेंबरपासून हैदराबादमध्ये सुरु होणार आहे. फक्त टी-20 मध्येच नाही तर वनडे मालिकेतही दोन्ही खेळाडूंमंध्ये लढत पाहायला मिळणार आहे. रोहित आणि विराट या दोघांनी आजवर 22-22 अर्धशतकं ठोकली आहेत, जे जगातील कोणत्याही खेळाडूने टी-20 मधील सर्वाधिक अर्धशतकं आहे. त्यामुळे, वर्षअखेरीस या दोघांपैकी कोण सर्वाधिक अर्धशतकं करतं हे पाहणे उत्साहाचे ठरेल. रोहित टी-20 स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या प्रकरणात कोहली दुसर्या क्रमांकावर आहे. या दोन खेळाडूंमध्ये फक्त 89 धावांचे आहे. अर्थात हे अंतर पूर्ण करण्यासाठी विराटचा मोठा डाव पुरेसा आहे. रोहितने 101 टी-20 सामन्यात 2539 धावा केल्या आहेत, तर कोहलीने 72 सामन्यात 2450 धावा केल्या आहेत.
शिवाय, विराटने यंदा वर्ष 2019 मध्ये आजवर सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. विराटने सर्व फॉरमॅटमध्ये (वनडे, टेस्ट आणि टी-20) 2,183 धावा केल्या आहे. याबाबतीतही रोहित त्याला स्पर्धा देत आहे. रोहितने यंदाच्या वर्षी 2,090 धावा केल्या आहेत आणि तो विराटच्या 93 धावा मागे आहे. रोहितला याबाबतीत जर विराटला मागे टाकायचे असेल तर विंडीजविरुद्ध त्याला प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करण्याची गरज आहे. दरम्यान, रोहितसाठी यंदाचे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. विश्वचषकमध्ये सलग 5 शतक केल्यावर रोहितने दक्षिण आफ्रिका आणि नंतर बांग्लादेशविरुद्ध प्रभावी कामगिरी केली. रोहितने 2019 मध्ये एकूण 9 शतकं केली आहे. यंदा कोणत्याही खेळाडूने केलेले ही सर्वाधिक शतकं आहे. रोहितने विंडीजविरुद्ध आणखी दोन शतक केले तर एका वर्षात केलेल्या खेळाडूने केलेल्या शतकांच्या बाबतीत विराटची बरोबरी करेल. विराटने 2017 आणि 18 वर्षात एकूण 11 शतकांची नोंद केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-20 सामन्यांच्या मालिकेला 6 डिसेंबरला सुरुवात होईल आणि नंतर 15 डिसेंबरपासून दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे खेळली जाईल.