IND vs WI 2019: टीम इंडिया मॅनेजर सुनील सुब्रमण्यम यांच्यवर गैरवर्तन केल्याचा आरोप, CoA कडून कडक कारवाईची शक्यता

सुब्रमण्यम यांनी गैरवर्तणूक केल्याची बातमी आता समोर येत आहे. याआधी 2018 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीही सुनिल सुब्रमण्यम बेजबाबदार वागण्यामुळे चर्चेत आले होते. याआधी सुब्रमण्यम यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही वेळ ओढावल्याचं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

अलीकडच्या काळात वाद आणि भारतीय संघाचे (Indian Team) संबंध खूपच खोल गेले आहेत. मागील काही दिवसांपासून भारतीय संघाचे खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि व्यवस्थापक काही कारणास्तव वादात सापडले आहेत. वेस्ट इंडीज (West Indies) दौर्‍यावरूनही वाद निर्माण होऊ लागला आहे. CoA समितीने हा वाद गंभीरपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे, कारण भारतीय संघाचा व्यवस्थापक या वादात अडकला आहे. टीम इंडियाचे सध्याचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम (Sunil Subramaniam) मोठ्या वादात अडकले आहेत. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत त्याच्या खराब वागण्यामुळे टीम मॅनेजरवर प्रश्न उपस्थित झाले पण त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली नाही. आता त्याने पुन्हा एकदा वेस्ट इंडिजमध्ये अशीच परिस्थिती निर्माण केली आहे. (IND vs WI 3rd ODI 2019: टॉस जिंकून वेस्ट इंडिजचा बॅटिंगचा निर्णय, संघात काय आहेत बदल ते पाहा)

विंडीजमाडेच भारतीय संघाला एका जाहिरातीमध्ये काम करायचे होते. कॅरिबियन बेटांवर ज्या ऍडसाठी शूट कार्याचे होते त्यासाठी बीसीसीआयने दोन उच्चायुक्तांना टीम मॅनेजर सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. पण, जेव्हा त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी सुब्रमण्यमशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांशी वाईट पद्धतीने बोलले आणि त्याकडे दुर्लक्ष केले. सुब्रमण्यम यांना त्यांच्या या कृत्यामुळे विंडीज दौऱ्या अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले आहे. यासंदर्भात बीसीसीआय संबंधित एका अधिका्याने पीटीआयला सांगितले की, "यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलय होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्यामुळेच त्यांचं धारिष्ट्य झालं. आता ही बाब विनोद राय (Vinod Rai) यांच्या पर्यंत पोहचल्याने कारवाई होऊ शकते.”

'ज्यांनी कोणी टीम व्यवस्थापक सुब्रमण्यम यांच्याही बोलणं केलं, ते सुब्रमण्यम यांच्या वर्तणुकीमुळे निराश झाले. आपल्या मित्रांसाठी तिकीट आणि पास मिळवणं हीच त्यांची प्राथमिकता आहे. आपल्या पदाची जबाबदारी पार पाडणं हे त्यांच्यासाठी नंतर येतं,' अशी टीकादेखील बीसीसीआय अधिकाऱ्याने केली. महत्वाची बाबी म्हणजे भारतीय संघासह सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ फक्त विश्वचषक पर्यंत होता. पण, नवीन संघ व्यवस्थापकाची नियुक्तीसाठी विलंब झाल्याने सुब्रमण्यम यांची, अन्य कोचिंग स्टाफसमवेत मुदत 45 दिवसांनी वाढविण्यात आली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif