IND vs WI 2019: टीम इंडिया-भारतीय उच्चयुक्त भेटीदरम्यान अनुष्का शर्मा हिच्याकडून ग्रुप फोटो 'नको रे बाबा'
पण, जेव्हा ग्रुप फोटो क्लिक करण्याची वेळ आली तेव्हा मागील वर्षी टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा झालेला कोणताही वाद टाळण्यासाठी अनुष्काने फोटोमधून बाहेर राहण्याला पसंती दिली.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma), जरी सध्या ती फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी ती अजूनही काही कारणास्तव चर्चेत राहिली आहे. चाहत्यांना अनुष्का शर्माचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून मिळतच राहतात. अनेकदा अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. दरम्यान, अनुष्काचा आणखी एक अपडेट केलेला फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियासोबत दिसली आहे. अनुष्का विराट आणि टीम इंडियासह जमैका येथे भारतीय उच्चायुक्तांच्या घरी डिनरसाठी पोहोचली होती. (IND vs WI 2nd Test: जमैका येथे भारतीय उच्चायुक्तांच्या घरी डिनरसाठी पोहोचली टीम इंडिया, अनुष्का शर्मा झाली ट्रोल)
डिनरच्या वेळी खेळाडूंचे गप्पा मारत आणि चांगले वेळ काढल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खेळाडू आणि उच्चायुक्त नाईक यांच्यासमवेत अनुष्कासुद्धा चांगल्या मूडमध्ये दिसली. अनुष्का लेपर्ड प्रिंट ड्रेस परिधान केलेली दिसली. पण, जेव्हा ग्रुप फोटो क्लिक करण्याची वेळ आली तेव्हा मागील वर्षी टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा झालेला कोणताही वाद टाळण्यासाठी अनुष्काने फोटोमधून बाहेर राहण्याला पसंती दिली. बीसीसीआयने टीम इंडियाच्या डिनरचा ग्रुप फोटो शेअर केला आणि यात अनुष्काला न पाहता नेटकऱ्यांनी तिला अनावश्यकपणे ट्रोल केले.
2018 मध्ये इंग्लंड दौर्यादरम्यान टीम इंडियाने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांना भेट दिली होती आणि त्यावेळी अनुष्काही त्यांच्यासोबत होती. पण विराटसोबत तिने पुढच्या रांगेत उभे राहत फोटो काढल्यामुळे वाद निर्माण झाला होता. शिवाय, टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला मागे उभे केले गेले आणि तो फोटोमध्येसुद्धा व्यवस्थित नव्हता. या वेळी सर्व गोष्टी अधिक स्पष्ट दिसत असल्या तरी अनुष्काने टीम इंडियासोबत फोटो सत्र वगळण्याचा योग्य निर्णय घेतला ज्यामुळे हा वाद नक्कीच टाळला गेला.