IND vs WI 1st T20I: पदार्पण सामन्यात Ravi Bishnoi याचे ‘नकोसे’ कृत्य, झेल घ्यायला गेला आणि दिला ‘षटकार’ (Watch Video)

भारताचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलने त्याला भारतीय कॅप देऊन टीम इंडियात त्याचे स्वागत केले. आपल्या पहिल्याच सामन्यात रवी बिश्नोईने मोठी चूक केली. त्याने घातक खेळाडूला बाद करण्याची संधी तर सोडलीच, पण 6 धावाही दिल्या.

नवोदित रवी बिष्णोई याचे ‘नकोसे’ कृत्य

IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातून फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारताचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) त्याला भारतीय कॅप देऊन टीम इंडियात (Team India) त्याचे स्वागत केले. मात्र, पहिल्या सामन्याचा अनुभव बिष्णोईसाठी चांगला ठरला नाही. आणि त्याने पहिल्याच षटकात अनेक वाइड चेंडू टाकले. इतकंच नाही तर वेस्ट इंडिजच्या डावात निकोलस पूरनने (Nicholas Pooran) चहलच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याने पकडला नाही. आपल्या पहिल्याच सामन्यात रवी बिष्णोईने मोठी चूक केली. त्याने घातक खेळाडूला बाद करण्याची संधी तर सोडलीच, पण 6 धावाही दिल्या. उल्लेखनीय म्हणजे पूरन त्यावेळी 14 धावांवर फलंदाजी करत होता. पण पुढे संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना केला 61 धावांचे झुंजार अर्धशतक ठोकले. (IND vs WI 1st T20I: निकोलस पूरन याचे झुंजार अर्धशतक, वेस्ट इंडिजचे भारतासमोर 158 धावांचे टार्गेट; भारताचा नवोदित रवी बिष्णोई पण चमकला)

लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या बिष्णोईला पूरनचा झेल घेतल्यानंतर स्वतःचा तोल सांभाळला आला नाही आणि सीमारेषेवर पाऊल टाकले, त्यामुळे युजवेंद्रचे दुहेरी नुकसान झाले. पहिले म्हणजे त्याला एक विकेट मिळाली नाही आणि त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार दिला. वेस्ट इंडिजच्या डावातील सातवे षटक युजवेंद्र चहलकडे सोपवण्यात आले. आणि चहलच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पूरनने चेंडू हवेत मारला. बिष्णोईने चेंडू सीमारेषेजवळ पकडला, पण त्याच्या पायाने बाउंड्री लाईनला स्पर्श केला. मैदानावरील अंपायरने सॉफ्ट निर्णय घेऊन प्रकरण थर्ड अंपायरकडे सोपवले, पण पूरन नाबाद असल्याचे रिप्लेने स्पष्ट केले. भारताला येथे विकेट घेण्यात यश आले नाही, उलट त्यांनी आणखी 6 धावा लुटल्या. मात्र, पाचव्या चेंडूवर चहलने काइल मेयर्सला पायचीत आऊट करून विंडीजला मोठा झटका करण्याचे काम केले.

दरम्यान, बिष्णोईने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चार षटकात 17 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतलीय. बिष्णोईने त्याच्या एका षटकात धोकादायक फलंदाजी करणाऱ्या मेयर्सला रोस्टन चेस, आणि रोव्हमन पॉवेल यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. भारतीय संघाने चहल आणि बिष्णोई या दोन लेगस्पिनर्सना पहिल्या सामन्यासाठी संघात सामील केले आहे. बिष्णोईचा हा पहिला टी-20 सामना असेल. तर वेस्ट इंडिज संघात जेसन होल्डरच्या जागी रोस्टन चेस खेळत आहे. सरावादरम्यान होल्डरला दुखापत झाली.