IND vs WI 1st ODI: टीम इंडियाचा 1000 व्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर 6 विकेटने विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
विंडीज संघाने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 43.5 षटकांत चार विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) आपल्या 1000 व्या सामन्यात 6 विकेटने विजय मिळवला. विंडीज संघाने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 43.5 षटकांत चार विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने 34 आणि अष्टपैलू दीपक हुडाने 26 धावांचे नाबाद योगदान दिले. दुसरीकडे, विंडीजसाठी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले पण धावसंख्या असल्यामुळे बॉलर्स अधिक योगदान देऊ शकले नाही. अल्झारी जोसेफने (Alzarri Joseph) विंडीज संघासाठी दोन विकेट घेतल्या तर अकील होसेनने एक विकेट घेतली. (IND vs WI 1st ODI: ‘कर्णधार नाही अजून लीडर’!, विराट कोहलीने पाळला आपला शब्द, पहिल्या वनडेत अशी केली रोहित शर्माची मदत Watch Video)
टॉस जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने विंडीज संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी विंडीज फलंदाजांवर हल्ला चढवला आणि सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. संघाने 79 धावांत 7 विकेट गमावले असताना संपूर्ण टीम शंभरी धावसंख्या देखील पार करू शकणार की नाही याची खात्री नव्हती अशा परिस्थितीत अष्टपैलू जेसन होल्डर आणि फॅबियन अॅलन यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. दोंघांनी संघाला दीडशे धावसंख्या पार करून देत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. यादरम्यान होल्डरने भारताविरुद्ध तिसरे अर्धशतक झळकावले. तथापि टीम इंडिया गोलंदाजांनी पुन्हा आपली लय मिळवली आणि उर्वरित तीन विकेट घेत विंडीजचा डाव 176 धावांत आटोपला. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासमोर विंडीजचा एकही फलंदाज चालला नाही. चहलने चार आणि सुंदरने तीन विकेट घेतल्या. याशिवाय प्रसिद्ध कृष्णाला दोन आणि मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी सलामीला उतरली. दोघांनी सावध सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या रोहितने 44 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले. पण जोसेफने आपल्या एकाच षटकांत रोहित आणि विराट कोहली यांच्या दोन प्रमुख विकेट काढल्या. त्यानंतर किशन देखील स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. तर अखेरीस सूर्यकुमार यादवच्या शॉटवर रिषभ पंत रनआउट झाला. पण सूर्यकुमारने नवोदित दीपक हुडाच्या साथीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली.