IND vs WI 1st ODI 2019: भारत-वेस्ट इंडिज सामन्यात पावसाचा खोडा, खेळ थांबवला

गयानामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघातील पहिल्या वनडे सामन्यात पावसाने पुन्हा खोडा घातला. आजच्या सामान्य टॉस जिंकत भारताचा कर्णधार विराट कोहली याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाने व्यत्यय घालण्याआधी विंडीज संघाने 2 ओव्हरमध्ये 1 धावा केल्या. सध्या विंडीजसाठी ख्रिस गेल आणि एव्हिन लुईस खेळपट्टीवर आहे. गयानामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघात 43 ओव्हरचा सामना खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वचषकमध्ये झालेल्या पराभवानंतर आज पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा सामना प्रोव्हीडन्स स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. आजच्या या सामन्यासाठी भारतीय संघात केदार जाधव, कुलदीप यादव, आणि मोहम्मद शमी यांचे पुनरागमन झाले आहेत. श्रेयस अय्यर याला देखील संघात संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे, ख्रिस गेल (Chris Gayle) देखील विंडीज संघात परतला आहे. गेलला टी-20 साठी विंडीज संघात स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकमध्ये गेल काही खास प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे विंडीजला गेलकडून मोठी खेळी करण्याची अपेक्षा आहे. तर 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने विश्वचषकमधील आपला फॉर्म बनवून ठेवला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने देखील मागील सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. पण भारतासाठी सर्वात मोठे काळजीचे कारण म्हणजे त्यांचे मधली फळी, जी कमकुवत आहे. टीम इंडियाच्या मांडल्या फळीत संघाने प्रयत्न म्हणून युवा खेळाडूंना खेळवण्याचा विचार केला आहे. माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या गैरहजेरीत भारताची मधल्या फळीची परीक्षा होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif