IPL Auction 2025 Live

IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक Rahul Dravid यांच्या यशामुळे इंग्लंडमध्ये बसलेल्या Ravi Shastri यांच्यावर वाढणार दबाव?

द्रविडच्या नेतृत्वातील संघाला श्रीलंकेत यश मिळालेत तर कुठेतरी इंग्लंडमध्ये उपस्थित असलेल्या मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्यावर दबाव येऊ शकतो. टी-20 वर्ल्ड कपनंतर शास्त्रींचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.

राहुल द्रविड आणि रवि शास्त्री (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2021: शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) श्रीलंका दौर्‍यासाठी (Sri Lanka Tour) कोलंबो येथे दाखल झाली आहे. राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) ‘विराटसेने’सोबत इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) असल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेत भारतीय संघाचा (Indian Team) ट्रॅक रेकॉर्ड आधीच उत्कृष्ट आहे आणि आता द्रविडच्या प्रशिक्षणाखाली प्रत्येकजण संघाकडून विजयाची अपेक्षा असेल. तथापि, या दरम्यान एक गोष्ट समोर आली आहे की द्रविडच्या नेतृत्वातील संघाला श्रीलंकेत यश मिळालेत तर कुठेतरी इंग्लंडमध्ये उपस्थित असलेल्या मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्यावर दबाव येऊ शकतो. श्रीलंका  (Sri Lanka) दौऱ्यावर टीम इंडिया 3 सामन्यांची वनडे व टी-20 मालिका खेळणार आहे. (IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर हे 3 भारतीय गोलंदाज यजमान फलंदाजांसाठी ठरू शकतात कर्दनकाळ)

श्रीलंकेतील टीम इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर ते आश्चर्यकारक आहे. उलट भारत श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ आहे. श्रीलंक यजमान संघ असला तरी टीम इंडिया विजयाचा प्रबळ दावेदार आहे. भारताचे मुख्य खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत, पण त्यानंतर या संघाला कमी लेखता येणार नाही. संघात युवा खेळाडू आणि बरेच अनुभवी खेळाडू या संघाचा एक भाग आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे द्रविडकडे संघाच्या कोचिंगची जबाबदारी आहे. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री इंग्लंडमध्ये अनुभवी खेळाडूंनी सुशोभित टीमसह उपस्थित आहेत. नुकतंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

आता टीम इंडियाला 4 ऑगस्टपासून यजमान ब्रिटिश संघासह 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण भारताने कसोटी मालिका जिंकल्यास शास्त्रींसाठी चांगले होईल मात्र जर संघाने कोणत्याही कारणास्तव ही मालिका गमावला तर शास्त्रींवर दबाव वाढवेल. टी-20 वर्ल्ड कपनंतर शास्त्रींचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्यामुळे जर टीम इंडिया इंग्लंडमध्ये विजय मिळवू शकली नाही तर शास्त्रींचा कार्यकाळ वाढवणे कठीण होईल. विशेष म्हणजे 2007 मध्ये द्रविडच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती.