IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर या 6 नवख्या खेळाडूंवर असणार नजर, टीम इंडिया XI मध्ये कोणाला मिळणार संधी

भारतीय संघात देवदत्त पडिक्क्ल, रुतूराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णाप्पा गौतम , वरुण चक्रवर्ती आणि चेतन सकारिया यांना पहिल्यांदा टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. अशास्थितीत कोणत्या क्रिकेटपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL Series 2021: जुलै महिन्यात खेळल्या जाणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) श्रीलंकेत (Sri Lanka) दाखल झाला आहे. सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारताचा मर्यादित ओव्हरचा क्रिकेट संघ सोमवारी मुंबईहून कोलंबोला  (Colombo) दाखल झाला. या दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री समवेत मर्यादित ओव्हरह्या स्टार खेळाडूं व्यतिरिक्त टीम इंडिया (Team India) श्रीलंका दौऱ्यावर  (Sri Lanka Tour) पोहचला आहे. या दौर्‍यावर माजी दिग्गज फलंदाज आणि विद्यमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहेत. चार आठवड्यांच्या दौर्‍यावर आलेल्या भारतीय संघात 6 नवीन खेळाडूंचा समावेश झाला आहे. (IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यापूर्वी Rahul Dravid यांनी स्पष्ट केली आपली रणनीती, हा असणार Shikhar Dhawan च्या टीम इंडियाचा मुख्य हेतू)

आयपीएल स्टार खेळाडू-देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal), रुतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), नितीश राणा, कृष्णाप्पा गौतम , वरुण चक्रवर्ती आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) यांना पहिल्यांदा टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. या सर्व खेळाडूंनी घरगुती क्रिकेट तसेच इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं होतं. यापैकी तीन खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून असेल. देवदत्त सध्याचा कर्णधार विराट कोहलीबरोबर फ्रँचायझी संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत आहे, तर रुतुराज हा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. तसेच यंदाच्या आयपीएल 2021 चेतन सकारियाने राजस्थान रॉयल्सकडून प्रभावी कामगिरी बजावली होती. तसेच, द्रविड यांनी श्रीलंकेत रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिल्ने शक्य नसल्याचेही स्पष्ट केले होते. अशास्थितीत कोणत्या क्रिकेटपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

धवनच्या नेतृत्वातील संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली सध्या कसोटी संघासह इंग्लंड दौर्‍यावर असल्यामुळे धवनकडे कर्णधार तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलो आहे. तसेच राहुल द्रविड संघाचे प्रशिक्षक आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif