IND vs SL: आपल्या झंझावाती खेळीने ‘हा’ खेळाडू टीम इंडियासाठी सामना जिंकत राहिला; रोहित शर्माने निवड सोपी नसल्याची दिली कबुली
अय्यरने मालिका विजयी कामगिरी करून सलग 3 अर्धशतके ठोकली आणि एकदाही बाद न होता 204 धावा पूर्ण केल्याबद्दल रोहितने मुंबईकर फलंदाजाचे कौतुक केले.
IND vs SL Series 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka0 धर्मशाला येथे टी-20 मालिकेत 3-0 अशा क्लीन स्वीपसह विजय मिळवल्यानंतर संघ निवड त्याच्यासाठी आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी थोडी अधिक आव्हानात्मक होईल असे कबूल केले. कोलकाता नाईट रायडर्सचा नवनियुक्त कर्णधारा श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मालिका विजयी कामगिरी करून सलग 3 अर्धशतके ठोकली आणि एकदाही बाद न होता 204 धावा पूर्ण केल्याबद्दल रोहितने मुंबईकर फलंदाजाचे कौतुक केले. या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका विजयात सूर्यकुमार यादवने 107 धावा करत संघात आपला दावा आणखी मजबूत केला. विंडीज संघाविरुद्ध 3-0 स्वीप दरम्यान कर्णधार रोहितने अय्यरसारख्या खेळाडूला इलेव्हनच्या बाहेर ठेवणे किती कठीण होते हे अधोरेखित केले होते. भारताने सूर्यकुमार, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी होती. पण हे तिघे श्रीलंकेविरुद्ध खेळले नसल्याने अय्यरने मिळालेल्या संधीच सोनं केलं आणि धमाकेदार फलंदाजीने सर्वानाच प्रभावित केलं. (IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी-20 सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड, रोहित शर्माच्या नावे निराशाजनक विक्रमाची नोंद)
विंडीज विरोधात फक्त एका सामन्यात संधी मिळालेल्या अय्यर श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत सलग 3 अर्धशतकं ठोकणारा कोहलीनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. “हे एक मोठे आव्हान असणार आहे, परंतु फॉर्ममध्ये नसून फॉर्ममध्ये असलेले असणे छान आहे. यातील काही खेळाडूंनी ज्या प्रकारे संधीचा फायदा घेतला आहे त्याप्रमाणे जर मुलांनी संधी साधली, तर तुम्ही ताकदीने पुढे जाऊ शकता,” अय्यरला खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्मची झलक दाखवल्यावर भरपूर समस्यांबद्दल विचारले असता रोहित म्हणाला. श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी काही खेळाडूंना आराम देण्यात आला तर काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले असताना भारताने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेदरम्यान अनेक खेळाडूंना आजमावले व कर्णधार रोहित म्हणाला की, खेळाडूंनी ज्या प्रकारे संधींचा फायदा घेतला त्याबद्दल तो आनंदी आहे.
दरम्यान श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेतून धाकड अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुखापतीनंतर मैदानावर पुनरागमन केलं. जडेजा बॉलने काही कमाल करू शकण्यात अपयशी ठरला असताना बॅटने त्याने गेल्या दोन्ही सामन्यात अय्यरला चांगली साथ दिली. जडेजा पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला, मात्र त्यानंतर त्याने अखेरच्या दोन सामन्यात अनुक्रमे 45 आणि 22 धावांची नाबाद खेळी केली. सलग 12 टी-20 सामन्यात आपली अजेय कामगिरी सुरु ठेवल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. रोहित शर्मा 4 मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध आगामी 2 सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करेल.