भारताला रोखण्यासाठी श्रीलंकेने बाहेर काढले सर्वात मोठे 'हथियार'; विश्वचषक विजेत्या खेळाडूची अचानक एन्ट्री

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; माजी कर्णधार हशन तिलकरत्ने आता सांभाळणार राष्ट्रीय संघाच्या फलंदाजीची धुरा

Photo Credit- X

आगामी आंतरराष्ट्रीय मालिका आणि भारतासारख्या बलाढ्य संघांविरुद्धच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या पुरुष संघाच्या फलंदाजीला धार आणण्यासाठी माजी कर्णधार आणि १९९६ मधील विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य हशन तिलकरत्ने (Hashan Tillakaratne) यांची वरिष्ठ पुरुष क्रिकेट कार्यक्रमाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी (Batting Coach) नियुक्ती करण्यात आली आहे.

​३१ डिसेंबर २०२७ पर्यंत असणार करार

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, हशन तिलकरत्ने यांची ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू झाली असून त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत असणार आहे. या संपूर्ण कालावधीत ते नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटर (NHPC) येथे कार्यरत राहतील आणि राष्ट्रीय संघातील फलंदाजांच्या तंत्र आणि कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवतील.

​दिग्गज कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय अनुभव

हशन तिलकरत्ने हे श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील आघाडीचे फलंदाज राहिले आहेत:

​आंतरराष्ट्रीय कारकीर्द (१९८९ ते २००३): त्यांनी श्रीलंकेसाठी ८३ कसोटी आणि २०० एकदिवसीय सामने खेळले असून दोन्ही प्रकारांत मिळून ८,२०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

​विश्वचषक विजय: १९९६ मध्ये श्रीलंकेने जिंकलेल्या ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक संघात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

​प्रशिक्षक म्हणून दांडगा अनुभव

खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर तिलकरत्ने यांनी कोचिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी श्रीलंकेच्या पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय श्रीलंका महिला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक तसेच बांगलादेश महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement