IND vs SL 3rd T20I: तिसऱ्या टी-20 पूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ, ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूच्या अंतिम सामन्यात खेळण्यावर सस्पेन्स

सैनीच्या दुखापतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत आणि काही दिवस त्याला मैदानाबाहेर बसावे लागू शकते, असे सांगितले जात आहे. एक्सट्रा कव्हरवर 19 व्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणार्‍या सैनीने झेल पकडण्यासाठी उडी मारली आणि खांद्यावर आपटला.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) भारतीय क्रिकेट संघाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अष्टपैलू क्रुणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या इतर 8 खेळाडू आयसोलेट करण्यात आले आहेत. त्यामुळे संघाला आता उपस्थित खेळाडूंसोबत प्लेइंग इलेव्हन बनवण्यात भाग पाडले असून हे सर्व श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टी-20 मालिकेच्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडले आहेत. कृणालसह एकूण 9 भारतीय खेळाडू उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडले आहेत. यामुळे संघाला मोठे करावे लागले असून आता दुसऱ्या टी-20 फिल्डिंग दरम्यान नवदीप सैनी (Navdeep Saini) देखील दुखापतग्रस्त झाला आहे. चार नवीन खेळाडूंसोबत, दुसरा टी-20 खेळण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला (Indian Team) यजमान संघाच्या हातून 4 विकेटने पराभव पत्करावा लागला. (IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंकेचं जोरदार प्रत्युत्तर, भारतावर 4 विकेटने मात करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी)

आता शेवटच्या सामन्याआधी आणखी एक धक्का बसू शकतो. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुसऱ्या टी-20 मध्ये क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. सैनीच्या दुखापतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत आणि काही दिवस त्याला मैदानाबाहेर बसावे लागू शकते, असे सांगितले जात आहे. एक्सट्रा कव्हरवर 19 व्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणार्‍या सैनीने झेल पकडण्यासाठी उडी मारली आणि खांद्यावर आपटला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात सैनीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाणार होता पण आता खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्या या सामन्यात खेळण्यावर सस्पेन्स बनून आहे. तसेच नवदीप सैनी ज्या प्रकारे मैदानावर पडला ते पाहिल्यास तिसर्‍या टी-20 सामन्यात त्याचे खेळणे अवघड दिसत आहे. जखमी होताच सैनीला तातडीने मैदानातून बाहेर नेण्यात आले.  सध्या डॉक्टरांची टीम सैनीच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असून त्याला आजच्या सामन्यात खेळण्यास तंदुरुस्त मानले जात नसल्याचे वृत्त समोर येत आहे.

दरम्यान, सध्या दोन्ही संघातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत असून दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाकडून नितीश राणा, देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया यांनी पदार्पण केले होते. भारताने पहिले बॅटिंग करून 132 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंकेने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 133 धावा केल्या आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.