IND vs SL 2nd ODI Likely Playing XI: श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते धवन ब्रिगेडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, मनीष पांडेचा होणार पत्ता कट?
आता संघ दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज असून पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कदाचितच बदल होऊ शकतो. श्रीलंकेविरुद्ध पाहिल्या सामन्यात मनीष पांडे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला असला तरी प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या स्थानाला धोका कमीच आहे.
IND vs SL 2nd ODI Likely Playing XI: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वातील भारतीय संघ (Indian Team) आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहेत. लंकन संघाला 50 ओव्हरमध्ये 262/9 धावांपर्यंत रोखून ठेवत टीम इंडियाने (Team India) अष्टपैलू कामगिरी दाखवली. 263 धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाजही चांगल्या लयीत दिसत होते. कर्णधार म्हणून सलामी फलंदाज शिखर धवनने पहिल्या सामन्यात नेतृत्वासह बॅटने शानदार कामगिरी केली आहे संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. आता संघ 20 जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज असून पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कदाचितच बदल होऊ शकतो. श्रीलंकेविरुद्ध पाहिल्या सामन्यात फलंदाजी क्रमवारीत मनीष पांडे (Manish Pandey) प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला असला तरी प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या स्थानाला धोका कमीच आहे. (IND vs SL 1st ODI: विजयानंतर कर्णधार शिखर धवनने ‘या’ 2 खेळाडूंचे केले गुणगान, म्हणाला- ‘त्यांनी 15 ओव्हरमध्ये सामना...’)
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या जोडीने आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स संघातील कमाल भागीदारीची आंतरराष्ट्रीय स्तरावर झलक दाखवली. पृथ्वीने आक्रमक पवित्रा घेतला असताना धवन स्लो कामगिरी करत राहिला ज्यामुळे युवा फलंदाजाला मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली. अशास्थितीत पृथ्वीचे स्थान कायम राहील. पदार्पणाच्या सामन्यात 42 चेंडूत 59 धावा केलेल्या ईशान किशनला दुसऱ्या सामन्यात देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले जाईल. सूर्यकुमार यादवच्या रूपात संघाला एक चांगला फिनिशर मिळाला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मनीष पांडे प्रभावित करू शकला नाही, पण दुसर्या वनडेत त्याला आणखी एक शॉट मिळण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो आणि लय परत मिळवण्यासाठी त्याने काही खेळ खेळावे अशी संघ व्यवस्थापाची इच्छा असेल.
हार्दिक पांड्याला बॅटने कमाल करण्याची संधी मिळाली नाही शिवाय, बॉलने देखील तो महागडा सिद्ध झाला. पण दुखापत नसल्यास त्याला संघातून वगळणे फायद्याचे ठरणार नाही. इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेवर शंका घेत असलेल्या समीक्षकांना उत्तर देत क्रुणाल पांड्याने आर्थिकदृष्ट्या चांगली गोलंदाजी केली. अन्य नियमित गोलंदाजांमध्ये- भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर- यांचे स्थान देखील कायम राहील.
भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, ईशान किशन, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दीपक चाहर.