IPL Auction 2025 Live

IND vs SL 2nd ODI: दुसरा वनडे जिंकत टीम इंडियाला डबल फायदा, मालिका खिशात घालत ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानला ओव्हरटेक करत केला विश्वविक्रम

विशिष्ट विरोधकांविरुद्ध संघाच्या सर्वाधिक विजयाची नोंद आता टीम इंडियाच्या नावर झाली आहे. लंकन संघाविरुद्ध भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा 93 वा विजय ठरला आहे.

भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 2nd ODI: शिखर धवनच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ (Indian Team) सध्या श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) असून वनडे मालिकेचा दुसरा सामना जिंकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. या मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात दीपक चाहरच्या (Deepak Chahar) अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजयाची नोंद केली. यासह भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत सामन्यासह मालिकाही खिशात घातली आणि ऑस्ट्रेलिया (Australia), पाकिस्तान (Pakistan) संघांनाही पिछाडीवर टाकले. विशिष्ट विरोधकांविरुद्ध संघाच्या सर्वाधिक विजयाची नोंद आता टीम इंडियाच्या (Team India) नावर झाली आहे. लंकन संघाविरुद्ध भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा 93 वा विजय ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने अनुक्रमे न्यूझीलंड व न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येकी 92 विजय मिळवले आहेत. (IND vs SL 2nd ODI 2021: चाहरने केला कहर, दमदार फलंदाजी करत खेचून आणला रोमहर्षक विजय; श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात करून 2-0 ने भारताच्या मालिका खिशात)

इतकंच नाही तर 2007 पासून श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा नववा मालिका विजय ठरला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाने पहिले फलंदाजी करून भारताला विजयासाठी 276 धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत आघाडीचे तीनही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, कृणाल पांड्या आणि अखेरच्या क्षणी दीपक चाहरच्या निर्णायक अर्धशतकी कामगिरीने सामन्यासह मालिकाही भारतीय संघाच्या खिशात घातली. दीपक धावा करून नाबाद परतला तर सूर्यकुमारने 53, तर कृणालने 35 आणि मनीष पांडेने 37 धवनची छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, श्रीलंकन गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि नियमित अंतराने विकेट्सही काढल्या मात्र चाहरने त्यांचा खेळ खराब केला.

दरम्यान, संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत धवनला श्रीलंका दौऱ्यासाठी युवा संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. तसेच, रवि शास्त्री देखील इंग्लंडमध्ये असल्यामुळे माजी दिग्गज फलंदाज आणि अंडर-19 संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मुख्य-प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती.