IND vs SL 2nd ODI 2021: चाहरने केला कहर, दमदार फलंदाजी करत खेचून आणला रोमहर्षक विजय; श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात करून 2-0 ने भारताच्या मालिका खिशात

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने यजमान श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली आणि तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. दीपकने निर्णायक क्षणी शानदार बॅटिंग करत विजयश्री खेचून आणला. दीपकने चेंडूत 69 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. भुवनेश्वर कुमार 19 धावा करून नाबाद राहिला.

दीपक चाहर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 2nd ODI 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरच्या (Deepak Chahar) अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) यजमान श्रीलंकेवर (Sri Lanka) 3 विकेट्सने मात केली आणि तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. दीपकने निर्णायक क्षणी शानदार बॅटिंग करत विजयश्री खेचून आणला. दीपकने 82 चेंडूत 69 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. यापूर्वी त्याने बॉलने 2 विकेट्स देखील काढल्या होत्या. दीपकव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 53 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. मनीष पांडेने 37 तर कर्णधार शिखर धवनने 29 धावांचे योगदान दिले. कृणाल पांड्याने 35 धावांची खेळी केली. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) 19 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) 3 विकेट्स घेतल्या. कसुन राजीता, लक्षण संदाकन आणि दासुन शनाका यांना प्रत्येकी एक विकेट काढली. (IND vs SL 2nd ODI: दुसरा वनडे जिंकत टीम इंडियाला डबल फायदा, मालिका खिशात घालत ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानला ओव्हरटेक केला हा विश्वविक्रम)

श्रीलंकेने दिलेल्या सहज धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या पाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावल्या. सामन्यातील तिसऱ्याच षटकात हसरंगाने पृथ्वी शॉला त्रिफळाचित केलं. पृथ्वी पाठोपाठ ईशान किशन फक्त एक धाव करून माघारी परतला. हसरंगाने धवनला 29 धावांवर पायचित केलं आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार आणि पांडेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी संघाला शंभरी पार करून दिली पण विचित्र पद्धतीने मनीष धावबाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याला भोपळादेखील फोडता आला नाही. यांनतर सूर्याला कृणाल पांड्याची साथ मिळाली ज्याने श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेत धावफलक हलता ठेवला.

यादरम्यान, 42 चेंडूत 52 धावा करत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलं अर्धशतक झळकावलं. परंतु,परंतु, 53 धावांवर असताना लक्षण संदाकनने त्याला पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. कृणाल पांड्याने संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र कृणाल बाद होताच सामना भारताच्या हातून निसटला असे दिसत असताना दीपकने आक्रमक बॅटिंग करून सामन्यासह मालिकाही भारताच्या खिशात घातली. यापूर्वी भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now