IND vs SL 2021: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडिया कर्णधार शिखर धवनच्या खांद्यावर असणार ‘ही’ मोठी जबाबदारी

भारतीय संघाचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार असून त्याच्या खांद्यावर ही मालिका मोठी जबाबदारी असल्यासारखे आहे, कारण टीम इंडियाने आजवर श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका कधीही गमावली नाही.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SL T20I Series: भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) आज, 25 जुलैपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अंतिम मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ यजमान श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दोन हात करण्यासाठी मैदानात उतरेल. संघाचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करणार असून त्याच्या खांद्यावर ही मालिका मोठी जबाबदारी असल्यासारखे आहे, कारण टीम इंडियाने (Team India) आजवर श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका कधीही गमावली नाही. भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली असली तरी मालिकेतील शेवटचा सामना यजमान श्रीलंकेने शानदार पद्धतीने जिंकला होता हे भारतीय खेळाडूंनी लक्षात ठेवले पाहिजे. (IND vs SL 1st T20I Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना लाईव्ह कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार?)

अशा परिस्थितीत कर्णधार शिखर धवन याच्यावर दुहेरी जबाबदारी असेल. एक जबाबदारी अशी आहे की टीम इंडियाला कमबॅक करून द्यायचे आहे आणि दुसरी जबाबदारी म्हणजे की भारतीय संघाची विजयी मालिका कायम ठेवणे. दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप 2021 पूर्वी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आता फक्त केवळ तीन मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषक संघात संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी कर्णधार धवन तसेच उर्वरित खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असेल. जरी संघ जवळजवळ निश्चित झाला असला तरीही काही खेळाडूंना संधी मिळू शकते.

खेळाच्या छोट्या स्वरूपात भारत आणि श्रीलंका यांच्यातील टक्कर ही भारताच्या बाजूने एकतर्फी राहिली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध भारताचा वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत टी -20 मध्ये भारत आणि श्रीलंका यांनी 19 वेळा आमनेसामने आले होते. यादरम्यान भारत 13 वेळा विजयी झाला आहे तर श्रीलंकेने केवळ 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच फक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. दुसरीकडे, श्रीलंका आणि भारत यांच्यात टी -20 आंतरराष्ट्रीय स्वरूपात आतापर्यंत सात मालिका खेळल्या गेल्या आहेत. या सात मालिकांमध्ये श्रीलंकेने फक्त एकदा बरोबरी साधली असून 6 मालिकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे असे म्हटले जाऊ शकते की श्रीलंके विरोधात भारताने एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे धवन ब्रिगेडवर यजमान संघाविरुद्ध विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचे मोठे आव्हान असेल.



संबंधित बातम्या