IND vs SL 2021: शिखर धवनच्या टी-20 वर्ल्ड कप XI मधील स्थानावर भारताच्या दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान, पाहा काय म्हणाले

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने म्हटले की, धवनने धावा केल्या तरीही त्याच्यासाठी विराट कोहलीचा पाठिंबा मिळवणे आणि टी-20 विश्वचषकातील इलेव्हनच्या सलामी जागा मिळवणे अवघड आहे.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2021: भारतीय संघाचा (Indian Team) आगामी श्रीलंका दौरा (Sri Lanka) टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेपूर्वी अनेक खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. युएई आणि ओमान येथे आयोजित होणाऱ्या स्पर्धेसाठी जवळपास भारतीय संघ निश्चित झाला आहे अद्यापही खेळाडूंसाठी काही जागा शिल्लक आहे. त्यामुळे मर्यादित ओव्हरच्या श्रीलंका दौऱ्यावर प्रभावी कामगिरी करत खेळाडू भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू शकतात. श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यासाठी देखील स्पर्धा महत्वाची आहे. टी -20 मध्ये केएल राहुलच्या (KL Rahul) वाढीमुळे भारताचा अन्य स्टार सलामीवीर धवनला मागे होण्यास भाग पाडले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) म्हटले की, धवनने धावा केल्या तरीही त्याच्यासाठी विराट कोहलीचा पाठिंबा मिळवणे आणि टी-20 विश्वचषकातील इलेव्हनच्या सलामी जागा मिळवणे अवघड आहे. (IND vs SL 2021: भारत-श्रीलंका मालिकेच्या नवीन तारखांची घोषणा, जाणून घ्या कधी खेळला जाणार पहिला वनडे)

“हे एक जिज्ञासू प्रकरण आहे. तुम्हाला वाटेल की राहुल आणि रोहितने ओव्हरटेक केले आहे पण शिखर धावा करत आहे. तो त्या दोघांवर दबाव ठेवतो. पहा, त्याला धावा घ्याव्या लागतील. एक खेळाडू म्हणून, आपण हेच करू शकता. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडीत श्रीलंका मालिका किती निर्णायक ठरेल माहित नाही, तो फक्त त्याच्या पुढील खेळाडूंवर दबाव आणू शकतो,” अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स आयोजित भारताच्या श्रीलंका दौऱ्यावरील व्हर्च्युअल प्रेसरवर अजित आगरकर म्हणाले. धवनने एकदिवसीय मालिकेत धावा केल्या असून आयपीएलमध्ये तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. मात्र, विराट कोहलीने रोहित शर्मासह टी-20 मध्ये सलामीसाठी आपले नाव पुढे केल्यामुळे धवनसाठी दरवाचे बंद होताना दिसत आहे. पण अजित आगरकर यांचा असा विश्वास आहे की जर कोणाला दुखापत झाली तर त्याचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्याला बऱ्याच धावांनी सज्ज असावे लागेल आणि निवड समितीवर त्याचा विचार करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.

त्यामुळे श्रीलंकेचा दौरा शिखर धवनसाठी आणखी महत्त्वाचा ठरणार आहे. कमकुवत प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने केवळ संघाकडे नेतृत्व करण्यासाठीच नाही तर कामगिरी करण्यास व धावा करण्याचा दबावही त्याच्यावर असेल.