IND vs SL 2021: 'बोल के मारा रन आउट'... Ishan Kishan ने आधी श्रीलंकन फलंदाजाला दिली चेतावणी मग दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता (Watch Video)
रन आऊटनंतर ईशान किशनचा आवाज स्टम्प माइकमध्ये कैद झाला, ज्यामध्ये तो आपल्या कर्णधाराशी रन आऊट असे केले याबद्दल बोलताना ऐकू आला.
IND vs SL 2nd 2021: ईशान किशनला (Ishan Kishan) आव्हान घेणे आवडते असे दिसत आहे. श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) मालिकेच्या सलामीच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानंतर युवा फलंदाजाने मंगळवारी दुसर्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात किशनने चतुराईने शानदार रन आऊट केले. लक्षण संदाकनला (Lakshan Sandakan) धावबाद करण्यासाठी किशनने अंडर आर्म थ्रो केला आणि खेळाविषयी आपली जागरूकता दाखवली. ईशान किशनने केलेल्या या रन आऊटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. भुवनेश्वर कुमारने डावाच्या शेवटच्या षटकातील तिसरा बॉल स्लो टाकला जो ईशानने पकडून स्टम्पच्या दिशेने फेकला. रन आऊटनंतर ईशान किशनचा आवाज स्टम्प माइकमध्ये कैद झाला, ज्यामध्ये तो आपल्या कर्णधाराशी रन आऊट असे केले याबद्दल बोलताना ऐकू आला. (IND vs SL 2nd ODI: राहुल द्रविडच्या त्या मास्टर स्ट्रोकमुळे झाला भारताचा विजय, भुवनेश्वर कुमारचा मोठा खुलासा)
संदाकनला चोरटी धाव घेऊन चमिका करुणारत्नेला स्ट्राईकवर आण्याच्या प्रयत्नात होता, जो की चांगल्या लयीत होता पण विकेटच्या मागे असलेल्या ईशानने चतुराई अंडर आर्म बॉल फेकला आणि स्टंपच्या बेल्स विखुरल्या. यानंतर तो माइकमध्ये कर्णधार शिखर धवनला सांगताना ऐकू आला की त्याने बोलून धावबाद केले आहे. किशनने पहिल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. सामन्यानंतर किशनने सांगितले होते की तो पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट खेळणार असे सर्वांना ड्रेसिंग रूममध्ये सांगून आला होता. दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 275 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर पाच चेंडू शिल्लक असताना 3 गडी राखून सामना जिंकला.
या विजयासह शिखर धवनच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला आणि 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दीपक चाहर आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर संघाच्या विजयाचा नायक ठरला. दीपकने 82 चेंडूत 69 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. शुक्रवार, 23 जुलै रोजी मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाईल. जिथे यजमान संघ विजयासह क्लीन-स्वीप टाळण्याच्या प्रयत्नात असेल.