IPL Auction 2025 Live

IND vs SL 1st Test: विराट कोहली याला 100 व्या कसोटीत मोठ्या विक्रमाची संधी, Ashwin याच्या निशाण्यावर दिग्गज अष्टपैलूचा सर्वकालीन रेकॉर्ड

हा सामना माजी कर्णधार विराट कोहली व दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यासाठी एका कारणामुळे विशिष्ट ठरणार आहे. विराटच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअरमधील हा 100 वा सामना असेल तर अश्विनला माजी कर्णधार कपिल देव यांचा सर्वकालीन विक्रम मोडण्याची संधी असेल.

विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 1st Test: टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) आता दोन कसोटी सामन्यात आमनेसामने येणार आहेत. मोहालीच्या (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम 4 मार्चपासून पहिला सामना खेळला जाणार आहे. आणि हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) व दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन  (Ravichandran Ashwin) यांच्यासाठी एका कारणामुळे विशिष्ट ठरणार आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट या सामन्यात 2014 नंतर प्रथमच एक फलंदाज म्हणून खेळणार असून त्याच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअरमधील हा 100 वा सामना असेल. अशा परिस्थितीत विराटला एक खास खेळी करून या सामन्याला आणखी संस्मरणीय बनवायचे असेल. देशासाठी 100 कसोटी सामने खेळणारा विराट कोहली हा केवळ 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. (IND vs SL 1st Test: मोहाली कसोटीत विराट कोहली याला अशा मोठ्या विक्रमाची संधी जो कोणत्याही भारतीय फलंदाजाला आतापर्यंत नाही जमला)

पण आधुनिक काळातील दिग्गज फलंदाज खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठण्यापासून 38 धावा दूर आहे. कोहलीने असे केले तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर हा पराक्रम करणारा तो केवळ सहावा भारतीय ठरेल. इतकंच नाही तर भारताच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 38 धावा केल्या तर तो सर्वात जलद धावा करणारा पाचवा भारतीय ठरेल. कसोटी क्रिकेटमध्ये हा टप्पा सर्वात जलद पार करणारा सचिन आघाडीचा खेळाडू आहे. मास्टर-ब्लास्टरने 154 डावात ही कमाल केली होती. याशिवाय, मोहाली कसोटी सामन्यात जेव्हा स्टार फिरकीपटू अश्विन श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्याच्या निशाण्यावर एक विक्रम असेल, जो केवळ एक भारतीय मोडू शकला आहे.

देव दोन दशकांपासून भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये कपिल यांच्या नावावर 131 कसोटी सामन्यांमध्ये 434 विकेट्स आहेत. सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत भारतीय गोलंदाजांच्या यादीत कपिल दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र आता मोहाली कसोटीत अश्विन कपिल देव यांना मागे टाकू शकतो. अश्विनच्या नावावर 430 विकेट आहेत. या सामन्यात किंवा पुढील सामन्यात तो त्याला देव यांना मागे टाकण्यासाठी त्याला फक्त 5 विकेट्सची गरज आहे. अशा प्रकारे श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना दिग्गज भारतीय खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरणार आहे.