R Ashwin Scripts World Record: अश्विनचा ऐतिहासिक पराक्रम, कपिल देवचा सर्वात मोठा विक्रम मोडीत बनला भारताचा दुसरा महान कसोटी गोलंदाज

विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 1st Test Day 3: भारताचा फिरकीपटू अश्विन (Ashwin) याने श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दिग्गज अष्टपलू आणि माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा विक्रम मोडला आहे. कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 434 विकेट घेतल्या. आणि मोहाली कसोटी (Mohali Test) सामन्यात अश्विनने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 विकेट घेऊन त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडला आणि भारताचा दुसरा महान गोलंदाज बनला. तसेच अश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. भारतीय संघासाठी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये अनिल कुंबळेने विक्रमी 619 विकेट्स घेतल्या आहेत.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुरली धरन याच्या नावावर आहे. मुरलीने 800 विकेट्स घेतल्या आहेत. तर शेन वॉर्नने कसोटीत एकूण 708 विकेट घेतल्या आहेत. तसेच इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या नावावर 640 कसोटी विकेट आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने 563 विकेट घेतल्या आहेत. लक्षात घ्यायचे की महान कपिल देव यांनी 131 कसोटीत 434 विकेट घेतल्या असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 वेळा 5 विकेट्स आणि 2 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय अश्विनने आपल्या 85 व्या कसोटी सामन्यातच कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. दरम्यान, अश्विन आणि कुंबळे यांनी कपिल देवचा विक्रम मोडला असला तरी कपिल आजही वेगवान गोलंदाजाने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहेत. कुंबळेने 132 सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत.

अश्विनने आता सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या बाबतीत टॉप 10 क्रिकेटपटूंच्या यादीतही प्रवेश केला आहे आणि तो नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 35 वर्षीय आर अश्विनने वनडेमधेही 150 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. वनडेच्या 113 सामन्यात 151 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 61 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकाविरुद्ध सामन्याबद्दल बोलायचे तर पहिल्या डावात लंकन संघाला 174 धावांत गुंडाळल्यावर मोहाली येथे सुरु असलेल्या सामन्यात अश्विनने पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. चरिथ अस्लंकाची विकेट घेताच अश्विनच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली.