IND vs SL 1st T20I: ईशान किशन याचा धुमाकूळ, टीम इंडियाचा टी-20 मध्ये ‘दस का दम’; पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस
या सामन्यात श्रीलंकेचा दारुण पराभव झाला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघाने बॅट आणि बॉलने रेकॉर्ड-ब्रेक खेळ केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात बनलेले महत्तवपूर्ण रेकॉड खालीलप्रमाणे आहेत.
IND vs SL 1st T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनऊच्या (Lucknow) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा दारुण पराभव झाला. भारताने हा सामना 62 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमावली असली तरी सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 2 गडी गमावून 199 धावांचा डोंगर उभारला. तर 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सर्व षटके खेळून 6 गडी गमावून 137 धावा केल्या आणि सामना 62 धावांनी गमावला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सह संपूर्ण संघाने बॅट आणि बॉलने रेकॉर्ड-ब्रेक खेळ केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात बनलेले महत्तवपूर्ण रेकॉड खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SL 1st T20I: पहिल्याच सामन्यात श्रीलंकेची शरणागती, भारताच्या विजयाचा सिलसिला सुरूच; मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी)
1. भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपक हुडा याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दीपक श्रीलंकेविरुद्ध लखनऊ टी-20 सामन्यात खेळणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा तो 97 वा खेळाडू ठरला आहे.
2. सलग 10 टी-20 सामने जिंकणारा भारत कसोटी खेळणारा फक्त दुसरा देश ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात युएईमध्ये गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकापासून ही मालिका सुरु झाली जिथे त्यांनी अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियावर सलग तीन विजय मिळवले. त्यानंतर भारताने न्यूझीलंड व वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी तीन टी-20 सामने देखील खिशात घातले. अफगाणिस्तान एकमेव कसोटी खेळणारा देश आहे ज्याने सलग 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.
3. भारतीय संघाचा सलामीवीर ईशान किशनने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी केली. त्याने 56 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 89 धावा चोपल्या. यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 56 धावा होती. त्याने अहमदाबादच्या इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात 56 धावा केल्या होत्या.
4. ईशान किशन टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर ठरला आहे. या प्रकरणात त्याने ऋषभ पंत आणि एमएस धोनीला मागे टाकले आहे. यष्टिरक्षक म्हणून 89 धावा करणारा किशन हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. पंतने विकेटकीपर म्हणून सार्वधिक 65 धावा केल्या होत्या.
5. ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 111 धावांची शतकी भागीदारी केली.
6. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने सामन्यात श्रीलंका कर्णधार दसुन शनाकाला बाद केला आणि जसप्रीत बुमराह याला मागे तडकून भारतासाठी सर्वाधिक टी-20 घेणारा गोलंदाज बनला. पहिल्या टी- सामन्यात बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. एकूणच बुमराहने 56 सामन्यात 66 तर चहलने 53 सामन्यात 67 विकेट घेतल्या आहेत.