IND vs SA Weather Update: पावसामुळे टीम इंडियाचा खेळ होवू शकतो खराब? जाणून घ्या पर्थमध्ये कसे असेल हवामान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज जो कोणी जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ असेल. अशा स्थितीत हा सामना पावसामुळे वाहून जावा असे दोन्ही संघांना वाटत नाही.

Photo Credit - Twitter

पावसाने T20 विश्वचषक 2022 चे काही मोठे सामने उद्ध्वस्त केले आहेत, ज्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता (IND vs SA Weather Update) आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. पर्थमध्ये होणारा हा सामना या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज जो कोणी जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ असेल. अशा स्थितीत हा सामना पावसामुळे वाहून जावा असे दोन्ही संघांना वाटत नाही. या आधीच दक्षिण आफ्रिकेचा एक सामना पावसामुळे आधीच वाहून गेला आहे, त्यामुळे या संघाला सामना न खेळता पुन्हा 1 गुण शेअर करायला आवडणार नाही. चला तर मग जाणून घेऊया आज पर्थमध्ये हवामान कसे असेल.

कसे असेल हवामान?

पर्थमध्ये संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. त्यावेळी भारतात संध्याकाळचे साडेचार वाजले असतील. Weather.com नुसार, रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. रात्री नऊनंतर दोन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही संघ कडाक्याच्या थंडीत सामने खेळतील. (हे देखील वाचा: IND vs SA Head to Head: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रविवारी होणार सामना, कोण आहे कोणावर वरचढ घ्या जाणून)

पाऊस पडला तर?

सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास प्रथम षटके कमी केली जातील. अंपायरला जास्तीत जास्त षटके टाकायची आहेत. किमान पाच षटकांचा सामना असू शकतो. पाच षटकांचा सामना होण्याची शक्यता नसल्यास सामना रद्द घोषित केला जाईल. आणि दोन्ही संघाना 1-1 गुण दिला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif