IND vs SA ODI Series: रोहित शर्मा वेळेत सावरला नाही तर ‘या’ तडाखेबाज सलामीवीरला मिळणार टीम इंडियाच्या वनडे संघाची कमान, अहवालातून झाला मोठा खुलासा
टीम इंडियाच्या व्हाईट बॉलचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा अजून आपल्या दुखापतीतून वेळेत सावरला नाही तर स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मालिकेत भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि तो दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून बाहेर पडला.
IND vs SA ODI Series: टीम इंडियाच्या (Team India) व्हाईट बॉलचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अजून आपल्या दुखापतीतून वेळेत सावरला नाही तर स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघाच्या 2021-22 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेनंतर संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील जी 19 जानेवारी, 2022 पासून बोलंड पार्क, पार्ल येथे खेळली जाईल. दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना बोलँड पार्क, पार्ल येथे 21 जानेवारी 2022 रोजी खेळवला जाईल आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 23 जानेवारी 2022 रोजी न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाईल. (Team India's likely Squad for SA ODIs: दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी असा असून शकतो भारताचा संभाव्य संघ, वाचा सविस्तर)
दरम्यान, विराट कोहलीला नुकतंच व्हाईट बॉल कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि रोहित शर्माची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्याला कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधारपदाचीही जबाबदारी देण्यात आली. तथापि, त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि तो दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून बाहेर पडला व राहुलला नवीन कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. कसोटी मालिका मुकल्यानंतर रोहित NCA मध्ये पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी काम करताना दिसला आणि अहवालांनुसार तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. “रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि जर तो वेळेत बरा झाला नाही तर त्याला वनडे मालिकेसाठी संघासह दक्षिण आफ्रिकेला पाठवणे शक्य होणार नाही. नवीन कर्णधाराच्या अनुपस्थितीत राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल,” बीसीसीआयच्या सूत्राने सोमवारी स्पोर्ट्स तकला सांगितले.
दरम्यान शिखर धवन, रुतुराज गायकवाड, रविचंद्रन अश्विन, व्यंकटेश अय्यर यांचा वनडे संघात समावेश असबर असल्याचीही चर्चा रंगली आहे. T20I आणि कसोटी संघात आपले स्थान गमावलेल्या धवनला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघातील संधी मिळण्याची तर प्रीमियर ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन, ज्याने अलीकडेच व्हाईट बॉल सेटअपमध्ये पुनरागमन केले आहे, एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)