IND vs SA: तिसऱ्या कसोटीत विराट कोहली ‘या’ फलंदाजाला करणार रिप्लेस; संघर्ष करणाऱ्या रहाणे-पुजाराच्या भविष्यावर भारतीय यष्टीरक्षकाने वर्तवले भाकीत
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली पुनरागमन करण्याची शक्यता असल्याने, रहाणे व पुजारा यांच्यापैकी एकाला विराट कोहलीसाठी जागा रिकामी करावी लागेल असे कार्तिकचे मत आहे. कोहलीला दुसऱ्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले आहे.
IND vs SA 2nd Test 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर बसावे लागले आहे. विराटच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे, पण केपटाऊन (Cape Town) येथील तिसऱ्या कसोटीसाठी कोहलीचे पुनरागमन अपेक्षित आहे त्यामुळे त्याच्यासाठी आता प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला डच्चू दिला जातो याबद्दल अनेकांना उत्सुकता असेल. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील आणखी एक निराशाजनक प्रदर्शनानंतर चाहते आणि तज्ज्ञ बदल करण्यास सांगत आहेत. दुखापतग्रस्त विराट मालिकेतील तिसर्या कसोटीसाठी पुनरागमन करण्याची शक्यता असल्याने, दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) पुजारा आणि रहाणेपैकी एक कर्णधारासाठी मार्ग काढण्यास बांधील असतील असे वाटते. (IND vs SA 2nd Test Day 1: ‘करिअर वाचवण्यासाठी एकच डाव शिल्लक’; जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप पुजारा, रहाणेवर भारतीय दिग्ग्जचे मोठे भाष्य)
जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा 33 चेंडूत 3 धावा करून बाद झाला तर रहाणे भोपळाही फोडू शकला नाही. तर पाठीच्या दुखापतीमुळे कोहलीला सामन्यातून बाहेर पडल्यानंतर, हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी पाठीच्या वरच्या बाजूला दुखापत झालेला कोहली केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त आणि उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोहली परतल्यावर कार्तिकला वाटते की विहारी नव्हे तर पुजारा किंवा रहाणेला वगळले जाईल. “नंबर 3 वर, जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघात, तीन वर्षे तिथे जागा शोधणे आणि शतक न करणे - त्याला (पुजारा) समजेल की त्याच्याकडे एक लांब, लांब रस्सी आहे. मोठ्या प्रमाणात तो खेळत आहेत कारण त्यांच्यात असलेल्या क्षमता आणि त्याने दाखवलेल्या कामगिरीबद्दल आणि अर्थातच ते वरिष्ठ आहेत [संघातील] पण त्यांना दिलेली संधी हळूहळू संपुष्टात येत आहे आणि तुम्ही त्यांचा शेवट जवळ आला आहे. मला खात्री आहे की त्या दोघांनाही याची जाणीव आहे. तसेच, आम्हाला मागील बाजूच्या खेळाडूंची क्षमता पाहायला मिळाली आहे, त्यांनी तसेच केले आहे. आता जर विराट कोहली परतला तर तुम्हाला अशी भावना येईल की त्यापैकी एक दोघांना मार्ग द्यावा लागेल,” कार्तिक क्रिकबझवर म्हणाला.
याशिवाय श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी सारखे खेळाडू संघात कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी स्वत:ला मजबूत करत आहेत. पुजारा आणि रहाणे दोघांचाही आता वेळ आणि संधी संपल्याचं अनेकांना वाटत आहे. दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे तर जोहान्सबर्ग येथे पहिल्या डावात केवळ केएल राहुल आणि आर अश्विन 30 धावांचा टप्पा पार करू शकले. पुजारा आणि रहाणे डावात आपली छाप सोडण्यास अपयशी ठरल्याने अनेकांची निराशा झाली. त्यामुळे संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी दोघांकडे आता आणखी एक डाव शिल्लक आहे.