IND vs SA 3rd T20I Pitch Report: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत पाहुण्या संघाचा 3 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा टी-20 जिंकून मालिकेत आघाडी घेण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team 3rd T20I 2024: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना 13 नोव्हेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत पाहुण्या संघाचा 3 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा टी-20 जिंकून मालिकेत आघाडी घेण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडे, टीम इंडियाला तिसऱ्या टी-20मध्ये यजमान संघाचा पराभव करून पुनरागमन करायचे आहे. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. टीम इंडियाने 29 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड पाहता भारतीय संघ अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट होते. ही मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळली जात असली तरी. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे भारतीय संघासाठी तितके सोपे नसेल. (हे देखील वाचा: IND vs SA 3rd T20 2024 Live Streaming: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारत करणार पुनरागमन की दक्षिण आफ्रिका मालिकेत घेणार आघाडी? 'इथे' जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)
तिसऱ्या टी-20 सामन्यात कशी असेल खेळपट्टी?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवला जाणार आहे. सेंच्युरियनच्या या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. खेळपट्टीवर भरपूर उसळी आहे, त्यामुळे चेंडू बॅटला चांगलाच आदळतो. मात्र, बाऊन्समुळे वेगवान गोलंदाज या मैदानावर अनेक संधी चोरू शकतात. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय अधिक फायदेशीर ठरू शकतो. खेळपट्टीतील ओलाव्यामुळे वेगवान गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात.
काय सांगतात आकडे?
सुपरस्पोर्ट पार्कने आतापर्यंत एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत. यापैकी 8 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे, तर 7 सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. सेंच्युरियनच्या या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 175 आहे. त्याचवेळी दुसऱ्या डावातील सरासरी स्कोअर 157 आहे. या मैदानावर, दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध स्कोअर बोर्डवर 259 धावा केल्या होत्या, जी सुपरस्पोर्ट पार्कमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 126 धावांचा बचाव करण्यातही प्रोटीजला यश आले आहे.
सेंच्युरियनमध्ये आघाडी घेण्यासाठी होणार लढत
मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये चुरशीची लढत होणार आहे. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विजयाची चव चाखली. मात्र, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने दमदार पुनरागमन करत 3 गडी राखून विजय मिळवला.