IND vs SA 2nd T20I: रेकॉर्ड तोड खेळीसाठी ICC ने केले विराट कोहली चे कौतुक, शाहिद आफ्रिदी ने केले 'हे' मोठे विधान
यासाठी आयसीसीने त्याचे अभिनंदन केले आहे. आफ्रिदीनेही आयसीसीच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत अजून एक ट्विट केले, ज्यात त्याने विराटचे कौतुक केले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतल्या दुसर्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद 72 धावा फटकावल्या आणि सामनावीर बनला. या खेळीदरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावांच्या बाबतीत रोहित शर्मा याला मागे टाकत कोहली नंबर एक फलंदाज बनला. सध्या टी-20 मध्ये कोणत्याही फलंदाजाने विराटपेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. यासाठी पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही त्याचे अभिनंदन केले आहे. सामना जिंकल्यानंतर आफ्रिदीने कोहलीसाठी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने विराटचे कौतुक केले आहे. (IND vs SA 2019: रोहित शर्मा याच्या लाडक्या लेकीच्या खेळण्यांसोबत शिखर धवन, रवींद्र जडेजा ची धमाल कॅमेऱ्यात कैद, Video)
विराटने कसोटी, वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये 50 हून अधिक च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि यासाठी आयसीसीने त्याचे अभिनंदन केले आहे. आफ्रिदीनेही आयसीसीच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत अजून एक ट्विट केले. आफ्रिदीने लिहिले, "अभिनंदन विराट कोहली! तुम्ही नक्कीच एक उत्तम खेळाडू आहेस. अशीच तुमची यशाची अपेक्षा आहे, जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत रहा."
आफ्रिदीने अनेक प्रसंगी विराटचे कौतुक केले. काल खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये कोहलीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह, या टी-20 मध्ये 11 व्या वेळी हा पराक्रम करणारा तो खेळाडू झाला, टी-20 मॅचमध्ये सर्वोच्च सामनावीर ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत तो आफ्रिदीसह संयुक्तपणे दुसर्या स्थानावर पोहोचला. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे. नबीने आजवर 12 वेळा सामनावीरचा पुरस्कार मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावत 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 19 ओव्हरमध्ये तीन गडी गमावत 151 धावा करत विजय मिळवला. डि कॉकने 52 आणि बावुमाने 49 धावा केल्या होत्या. मालिकेचा शेवटचा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना 22 सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे खेळला जाणार आहे.