IND vs SA 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ‘शुभारंभ’, T20 मध्ये कोणता संघ कोणाच्या वरचढ; जाणून घ्या महत्वाचे आकडे
टी-20 क्रिकेटमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, बहुतेक आकडेवारी भारताच्या बाजूने आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात आतापर्यंत चार टी-20 सामने खेळले आहेत.
IND vs SA Series 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. तब्ब्ल दोन महिन्यांच्या आयपीएलनंतर भारतीय संघ (Indian Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मासह अनेक स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार असलेल्या टीम इंडियासमोर (Team India) आपला टी-20 रेकॉर्ड कायम ठेवण्याचे आव्हान असेल. भारताने सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत आणि सलग 13 टी-20 सामने जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळत असलेल्या या संघासमोर विजयी सुरुवात करण्याचे आव्हान असेल. टी-20 क्रिकेटमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, बहुतेक आकडेवारी भारताच्या बाजूने आहे. (IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध Rohit Sharma च्या अनुपस्थितीने उठवले प्रश्न, प्रशिक्षक द्रविडने आपल्या उत्तराने केली बोलती बंद)
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात आतापर्यंत चार टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने केवळ एकच सामना जिंकला आहे. त्याचबरोबर द. आफ्रिकी संघाने तीन सामने जिंकले आहेत. 2015 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला सामना पाहुण्या संघाने सात गडी राखून जिंकला होता. यानंतर बाराबती स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने 6 गडी राखून विजय मिळवला. यानंतर 2019 मध्ये भारताला पंजाबमध्ये पहिला विजय मिळाला. मात्र, यानंतर पुन्हा दक्षिण आफ्रिकेने चिन्नास्वामीच्या टीम इंडियाचा पराभव केला. लक्षणीय आहे की भारताने पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि आतापर्यंत भारतीय संघाने बहुतांशी दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 9 तर दक्षिण आफ्रिकेने 6 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील एकही सामना आतापर्यंत बरोबरीत सुटलेला नाही. या मालिकेतही टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करणार असल्याचे या आकडेवारीवरून अंदाज लावला जाऊ शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 वेळा टी-20 मालिका खेळली गेली आहे. यामध्ये एका सामन्यापासून तीन सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत 2006-07, 2010-11 आणि 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा टी-20 मालिकेत पराभव केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 2011-12 आणि 2015-16 मध्ये भारताविरुद्ध टी-20 मालिका काबीज केली आहे. तसेच 2019-20 मध्ये दोन्ही देशांदरम्यान खेळलेली टी-20 मालिका अनिर्णित राहिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदाच 5 सामन्यांची T20 मालिका होणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20: 9 जून, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी-20: 12 जून, बाराबती स्टेडियम, कटक
तिसरा टी-20: 14 जून, VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
चौथा टी-20: 17 जून, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी-20: 19 जून, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर