IND vs SA 2021-22: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाच्या ‘या’ तीन धुरंधरांच्या कामगिरीवर असणार नजर, टीकाकारांची करू शकतात बोलती बंद
IND vs SA 2021-22: भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) आहे. दोन्ही संघात 26 डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्याने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात होईल. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील संघासमोर मोठी आव्हाने आहेत पण टीमला ऐतिहासिक मालिका जिंकण्याची देखील संधी आहे. परिस्थितीनुसार हा दौरा कठीण असल्याचे बोलले जात असले तरी सध्याचा यजमान संघ पाहता मालिका जिंकण्याची आशाही व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाच्या तीन खेळाडूंवर खास नजर असेल. दक्षिण आफ्रिकेचा दौरा भारतीय संघातील काही मोठ्या खेळाडूंसाठी मोठा असणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रभावी खेळ करून त्यांच्याकडे टीकाकारांची बोलती बंद करण्याची संधी असेल. (IND vs SA: कसोटी मालिकेपूर्वी Dean Elgar चे मोठे वक्तव्य; टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला म्हटले धोकादायक, कर्णधाराला आठवल्या 3 वर्ष जुन्या जखमा!)
विराट कोहली
दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला वनडे कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आल्यापासून बरेच काही घडले आहे. दौऱ्यापूर्वीच पत्रकार परिषदेने चांगलाच वाद निर्माण केला होता. या दौऱ्यावर कर्णधारपदाचा वाद मागे ठेवून कोहलीवर सर्वांचीच नजर असणार आहे. विराटने शेवटचे कसोटी शतक कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध डे/नाईट कसोटीत झळकावले होते. 2019 पासून त्याने आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही. त्यामुळे आता वर्षअखेरीस तो हे चित्र बदलू इच्छित असेल.
केएल राहुल (KL Rahul)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासाठी उपकर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या राहुलसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित शर्माच्या दुखापतीनंतर आतापर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या या फलंदाजाच्या खेळण्याच्या आशा वाढल्या असतील. तसेच रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्यावर सलामीच्या जागेवर मोठी जबाबदारी असेल. उपकर्णधार बनवल्यानंतर त्याची जागा निश्चित झाली आहे. पण शुभमन गिल आणि मयंक अग्रवालच्या उपस्थितीतने त्याच्यावरील दबाव वाढला असेल.
आर अश्विन (R Ashwin)
विशेष दौऱ्यांवर सहसा अश्विनला दिले जात नाही. इंग्लंड दौऱ्यावरही त्याला बाहेर बसून रहावे लागले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्टींवर त्याला संधी मिळणार की नाही यावर अजून संभ्रम कायम आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याने हरभजन सिंहला मागे टाकून भारताच्या अनुभवी फिरकीपटूवर सर्वांचे लक्ष असेल. अश्विनला अद्याप दक्षिण आफ्रिकेत स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. त्याने येथे खेळताना 3 कसोटीत केवळ 7 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत मालिका जिंकायची असेल तर त्याची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)