IND vs SA 2021-22: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर BCCI चे मोठे भाष्य, म्हणाले - ‘दौरा कायम, पण खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरि’

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) देशात नवीन कोविड-19 प्रकाराच्या वर्गीकरणानंतर या क्षणी कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नेदरलँड्स संघाची मालिका देखील पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता टीम इंडियाच्या मालिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले की, आगामी द्विपक्षीय मालिका कायम आहे.

बीसीसीआय (Photo Credits: IANS)

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) देशात नवीन कोविड-19 प्रकाराच्या वर्गीकरणानंतर (Omnicron) या क्षणी कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) या समस्येवर धोक्याची घंटा वाजवताच, देशभरातील क्रीडा स्पर्धा रद्द होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर  (South Africa Tour) असेलेल्या नेदरलँड्स (Netherlands) संघाची मालिका देखील पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता टीम इंडियाच्या (Team India) द्विपक्षीय मालिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, बीसीसीआयचे (BCCI) कोषाध्यक्ष अरुण धुमल (Arun Dhumal) यांनी शनिवारी सांगितले की, आगामी द्विपक्षीय मालिका कायम आहे आणि खेळाडूंची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जावी याबाबत बोर्ड सीएसएच्या (CSA) नियमित संपर्कात आहे. (दक्षिण आफ्रिका-नेदरलँड वनडे मालिकेस कोरोना स्ट्रेन 'Omnicron' मुळे ब्रेक; CSA कडून महत्त्वाची घोषणा)

“सध्या सांगण्यासारखे काही नाही. दोन्ही मंडळे नियमितपणे संपर्कात असतात. खेळाडूंची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य हे दोन्ही मंडळांसाठी महत्त्वाचे आहे. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत, दोन्ही बोर्डांना वाटले की काही करणे आवश्यक आहे, तर आम्ही निर्णय घेऊ,” धूमल यांनी एएनआयला सांगितले. “खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, जे काही करणे आवश्यक आहे ते केले जाईल. प्रेक्षकांना परवानगी आहे की नाही, ते दुय्यम आहे. खेळाला प्रथम प्राधान्य आहे,” ते पुढे म्हणाले. भारत पुढील महिन्यात तीन कसोटी, वनडे आणि चार टी-20 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बीसीसीआयने संघाला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यापूर्वी सरकारशी सल्लामसलत केली पाहिजे जिथे एक नवीन COVID-19 प्रकार उदयास आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या B.1.1.529 नवीन COVID-19 प्रकाराला 'ओमिक्रॉन' असे नाव दिले आहे. WHO ने नव्याने ओळखल्या गेलेल्या कोविड-19 प्रकारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर जाहीर केले. “कोरोना व्हायरस B.1.1.529 चे नुकतेच सापडलेले रूप चिंतेचे आहे. विज्ञानाला इतर चिंताजनक रूपाबद्दल माहिती आहे त्यापेक्षा त्यात जास्त उत्परिवर्तन आहेत. WHO ने या नवीन प्रकाराचे चिंताजनक म्हणून मूल्यांकन केले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकाराला शास्त्रज्ञांनी B.1.1.529 असे लेबल दिले आहे. WHO प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमेयर यांनी बैठकीनंतर सांगितले की सुरुवातीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आहेत ज्यासाठी आवश्यक आहे आणि पुढील अभ्यास केला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now