IND vs SA 2019: रोहित शर्मा याच्या लाडक्या लेकीच्या खेळण्यांसोबत शिखर धवन, रवींद्र जडेजा ची धमाल कॅमेऱ्यात कैद, (Video)

यामध्ये टीम इंडियाचे प्रेमळ आणि काळजी घेणारे तीन वडील, धवन, रोहित आणि जडेजा यांचा समावेश आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला धवन चाहत्यांना रोहितने त्याची लेक समयारसाठी घेतलेली खेळणी दाखवत आहे.

शिखर धवन, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: Instagram)

दक्षिण आफ्रिकेला (South Africa) दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने (Indian Team) तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. कर्णधार विराट कोहली याने पुन्हा एकदा विजयी कामगिरी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. टीम इंडिया आता बंगळुरूसाठी रवाना झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पुढील सामना 22 सप्टेंबर, रविवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. या मॅचमध्ये भारतीय संघाचे पारिजात देखील सहभागी होतील. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पत्नी रितिका साजदेह आणि लेक समयार, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे कुटुंब यांचा समावेश आहे. टीम इंडिया आज बंगळुरूसाठी रवाना झाली असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सुरु आहे. (IND vs SA 2nd T20I: विराट कोहली चं No 1, 'हिटमॅन' रोहित शर्मा चे 'हे' 2 वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत)

सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे प्रेमळ आणि काळजी घेणारे तीन वडील, धवन, रोहित आणि जडेजा यांचा समावेश आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला धवन चाहत्यांना रोहितने त्याची लेक समयारसाठी घेतलेली खेळणी दाखवत आहे. नंतर, जेव्हा शिखरने जड्डूला विचारले की त्याने त्याच्या मुलीला काय गिफ्ट दिले तर त्याने मस्करीत सांगितले की त्यानेदेखील त्याच्या लेकीला खेळणी गिफ्ट केली. पहा याचा भन्नाट व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Meet the loving and caring fathers from our team @rohitsharma45 & @royalnavghan 😉

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

भारत-दक्षिण आफ्रिकातिला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. कर्णधार कोहलीने नाबाद 72 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. याआधी गोलंदाजांनी प्रभावी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला 149 धावांवर गुंडाळले. आफ्रिकेसाठी कर्णधार क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक 52 धावा केल्या. डी कॉक सावध खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. टेम्बा बावूमा याने 49 धावा केल्या. पण, डी कॉक आणि बावूमा बाद झाल्यावर आफ्रिकी फलंदाजी गडगडली आणि त्यांच्या धावा करण्याचा रेट कमी झाला. गोलंदाजांनीदेखील त्यांची निराशा केली. भारतीय फलंदाजीची सुरुवात चांगली होताना रोहित बाद झाला. पण, नंतर शिखर आणि कोहलीने उत्तम फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले.