IND vs SA 1st Test Day 1 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

India vs South Africa LIVE streaming: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया रविवारी दक्षिण आफ्रिकेसोबत मालिकेचा पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची संपूर्ण माहिती खालिलप्रणे आहे.

IND vs SA 1st Test Day 1 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC)

India vs South Africa 1st Test Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चमकदार विजय मिळवल्यानंतर रविवारी सेंच्युरियनमधील (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे बॉक्सिंग डे सामन्यासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पहिल्या कसोटी विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या उद्देशाने बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) जिंकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. भारताने आफ्रिकेत आजपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. तर सेंच्युरियनमध्ये यजमान संघ आपला उत्कृष्ट विक्रम कायम ठेवण्याच्या निर्धारित असेल. तसेच भारतीय संघ आपला विक्रम सुधरवायच्या प्रयत्नात असेल. भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची संपूर्ण माहिती खालिलप्रणे आहे. (IND vs SA Series 2021-22: आता राहुल द्रविडची होणार खरी ‘कसोटी’, टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकाला ‘या’ 4 प्रश्नांवर काढावा लागणार तोडगा!)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी दिवस भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल तर नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 HD, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी HD, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी थेट प्रसारित करेल. आणि Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका संघ

दक्षिण आफ्रिका संघ: डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर, बेउरान हेंड्रिक्स, सिसंदा मॅगाला, जॉर्ज लिंडे, प्रिनेलन सुब्रेन, काइल वेरेन, सारेल एरवी, रायन रिकेल्टन, ग्लेंटन स्टुरमन, मार्को जॅन्सेन.

भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन) केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा , जयंत यादव, हनुमा विहारी, प्रियांक पांचाळ.

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 12:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).