IND vs SA 1st ODI: धर्मशालेत पाऊस बनला खलनायक, भारत-दक्षिण आफ्रिकामधील पहिली वनडे रद्द
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघ आता 15 मार्च रोजी लखनऊमध्ये खेळला जाईल.
भारत (India)-दक्षिण आफ्रिकामध्ये (South Africa) धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये (HPCA Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पावसाने खलनायकाची भूमिका बजावली आणि सामना रद्द करण्यात आला. यामुळे सामन्याची आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या चाहत्यांनी मात्र चांगलीच निराशा झाली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघ आता 15 मार्च रोजी लखनऊमध्ये (Lucknow) खेळला जाईल. जगभरात कोरोनव्हायरसच्या भीती खाली दोन्ही संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी एकत्र आले आहेत. टॉस देखील न होता सामना रद्द भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये या मैदानावरील हा सलग दुसरा सामना रद्द झाला आहे. यापूर्वी दोन्ही संघात याच मैदानावर 2019 मध्ये टी-20 मालिकेतील पहिला सामनाही रद्द झाला होता. (IND vs SA 1st ODI: पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिका पहिली वनडे रद्द होण्याची शक्यता, संतप्त चाहत्यांकडून BCCI ला बसली फटकार)
गुरुवारी धर्मशाला येथे भारत-दक्षिण आफ्रिकामधील सुरुवातीच्या वनडे सामन्यात कोरोनव्हायरसच्या भीतीमुळे चाहते कमी प्रेक्षक आले असले तरी रविवारी अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये आयोजक दुसर्या सामन्यात मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, नवीन कर्णधार क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि प्रशिक्षक मार्क बाऊचरसह (Mark Boucher) आफ्रिकेचा संघ 4 वर्षांनंतर वनडे मालिकेसाठी भारतात आला आहे. यापूर्वी, घरच्या मैदानावर खेळत ऑक्टोबर 2019 मध्ये आफ्रिका संघाने भारताला 3-2 ने पराभूत केले होते. कोरोनाव्हायरसमुळे दोन्ही बोर्डांनी खेळाडूंना मालिकेदरम्यान काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या, सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतले आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर 8 महिन्यांनंतर पांड्या पुन्हा मैदानात उतरणार आहे. या मालिकेपूर्वी त्याने डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत 4 दिवसात 2 शतकं ठोकून स्वत: ला सिद्ध केले आहे. टीम इंडिया आता आफ्रिकेविरूद्ध मालिकेच्या दुसर्या सामन्यात विजयासह सुरुवात करू पाहता असेल. या सामन्यातून न्यूझीलंडविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाला विसरून भारतीय कर्णधार विराट कोहली नव्याने सुरुवात करू इच्छित असेल.