IND VS PAK, T20 World Cup Live Streaming: भारत-पाकिस्तान सुपर-12 सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Star Sports व DD Sports वर आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग असे पहा
टी-20 विश्वचषक सापरधेत विराट कोहली पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 12 गेम स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केले जातील.
IND vs PAK Live Streaming: दुबईत (Dubai) होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup0 ब्लॉकबस्टर सामन्यात आज माजी चॅम्पियन भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ रविवारी आमनेसामने येतील. टी-20 विश्वचषक सापरधेत विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदा भारतीय संघाचे (Indian Team) नेतृत्व करेल. तर पाकिस्तानची धुरा युवा कर्णधार बाबर आजमकडे (Babar Azam) असेल. भारताने 2013 मध्ये द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानचा अखेर पाहुणचार केला होता आणि संघ आता फक्त आयसीसी व आशियाई स्पर्धांतच आमनेसामने येत असून दोन्ही संघात अखेर 2019 इंग्लंडमधील वनडे विश्वचषक सामना रंगला होता. तसेच आखेरवारी पाहता 2007 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध सर्व पाच सामने जिंकले आहेत. उल्लेखनीय म्हणजे सर्व सामने टीम इंडियाने (Team India) एमएस धोनीच्या नेतृत्वात जिंकले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगबाबत सर्व माहिती खालीलप्रमाणे आहेत. (IND vs PAK, T20 World Cup 2021: टी-ट्वेंटी रणसंग्राम, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज काट्याची टक्कर; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?)
भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर-12 राउंडमधील सलामीचा सामना दुबईमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 12 गेम स्टार स्पोर्ट्स चॅनेल - स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडीवर थेट प्रसारित केले जातील. तसेच डीडी स्पोर्ट्सवर देखील लाईव्ह सामन्याचा भारतीय चाहते आनंद घेऊ शकतात. याशिवाय हॉटस्टारवर भारत विरुद्ध पाकिस्तान T20 वर्ल्ड कप सामन्याचे ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतीय चाहत्यांसाठी उपलब्ध असेल. सामन्याच्या एक दिवसपूर्वी पाकिस्तानने आपल्या 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तर भारतीय संघाबाबत ‘सस्पेंस’ कायम आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्यासाठी संघ खालीलप्रमाणे आहेत.
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर.
पाकिस्तान (12): बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.