IND vs PAK, CWC 2019: क्रिकेट सामन्यापूर्वी सानिया मिर्झा पाकिस्तान संघासोबत पार्टी करताना दिसली,नेटकऱ्यांकडून टीका (Video)
यामुळे सोशल मीडियात पाकिस्तान संघाची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. त्यातच आता खेळाडू सानिया मिर्झा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
IND vs PAK, CWC 2019: रविवारी बहुप्रतिक्षित अशा भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) संघाचा आईसीसी वर्ल्ड कप 2019 मधील सामना मॅंनचेस्टरच्या (Manchester) मैदानावर येथे खेळवण्यात आला. या सामन्यात नेहमीप्रमाणेच भारताच्या संघाने पाकिस्तानला हरवले. यामुळे सोशल मीडियात पाकिस्तान संघाची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. त्यातच आता खेळाडू सानिया मिर्झा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत सानिया मिर्झा ही पाकिस्तानच्या संघासोबत पार्टी करताना दिसली आहे. तर ज्या ठिकाणी सानिया पार्टीत दिसली ते एक मँनचेस्टरमधील प्रसिद्ध शीशा नाईट क्लब आहे. तेथे पाकिस्तान संघातील खेळाडू आणि त्यांच्या पत्नी तेथे पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. या क्लबमध्ये काहीजण पार्टी सुरु असताना हुक्का पिताना दिसले. या अशा सर्व प्रकारामुळे सानिया हिला नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.
या व्हिडिओवर सानिया हिने आक्षेप घेतला आहे. तर आम्हाला न विचारता व्हिडिओ काढणे चुकीचे आहे. तसेच एखाद्याचे खासगी आयुष्याबद्दल अशा प्रकारे समोर आणणे गैर असल्याचे ही सानिया हिने म्हटले आहे.