IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: दिनेश कार्तिक याला माघारी धाडण्यासाठी जिमी निशाम याने घेतला अफलातून झेल, पहा (Video)

कार्तिक मोठा फटका मारायला गेला आणि आऊट झाला. यावेळी त्याचा अफलातून झेल जिमी निशाम ने पकडला.

आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सेमीफायनल सामन्यात सामन्यात भारताला चौथा धक्का बसला तो दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या रुपात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनल सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. 50 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताचा 4 खेळाडू माघारी परतले आहे तर सध्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. पण, या सामन्याच्या दहाव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर कार्तिक मोठा फटका मारायला गेला आणि आऊट झाला. यावेळी त्याचा अफलातून झेल जिमी निशाम (James Neesham) ने पकडला. (मायकेल वॉन याने संजय मांजरेकर याला ट्रोल करत केले ट्विटरवर ब्लॉक, रवींद्र जडेजा वरून सुरु झाला वाद)

दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या तर टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. पावसामुळे मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध सामना राखीव ठेवण्यात आला होता. बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने किवी फलंदाजांना आपल्या सुंदर क्षेत्ररक्षणाने रोखले.

टेलरला धावबाद करत जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथम (Tom Latham) चा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार मोठी धाव संख्या उभारता आली नाही. भुवनेश्वरने आपल्या 10 ओव्हरमध्ये 43 धावा देत तीन विकेट घेतल्या.