IND vs NZ T20I: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियातून संजू सॅमसन याला वगळल्याने यूजर्सने BCCI ला फटकारले
त्यांनी ट्विटरवर नेऊन आपला राग व्यक्त केला आणि निवड समितीला कोणी प्रश्न विचारेल का असाही प्रश्न विचारला
रविवारी न्यूझीलंड (New Zealand) दौर्यासाठी युवा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला भारताच्या (India) टी-20 संघातून वगळल्यावर बीसीसीआयच्या निर्णयाची सोशल मीडिया यूजर्सने टीका केली. न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका येत्या 24 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यासाठी भारतीय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ जाहीर केला. शिखर धवन (Shikhar Dhawan) याने आपले स्थान कायम ठेवले असून सॅमसनला वगळण्यात आले. बॅकअप विकेटकीपर-फलंदाज सॅमसनने 10 जानेवारी रोजी श्रीलंकाविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. तब्बल पाच वर्षांनी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करणाऱ्या संजूने या सामन्यात फक्त दोन चेंडूचा सामना केला. सॅमसनमध्ये प्रतिभा असल्याची काही शंका नाही, परंतु रविवारी फक्त एक खेळ खेळल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आल्याने त्याच्या करिअरमध्ये पुन्हा एकदा घसरण होताना दिसत आहे. संजूने कारकीर्दीत टीम इंडियासाठी आजवर फक्त दोन टी-20 सामने खेळले आहेत. (IND vs NZ: रोहित शर्मा,मोहम्मद शमी खेळणार न्यूझीलंड टी -२० मालिकेत; बीसीसीआयने टीम इंडिया संघाची केली घोषणा)
काल रात्री बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर केले तेव्हा त्याचे चाहते धीर देण्याच्या मन: स्थितीत नव्हते. त्यांनी ट्विटरवर नेऊन आपला राग व्यक्त केला आणि निवड समितीला कोणी प्रश्न विचारेल का असाही प्रश्न विचारला.
पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
संजू सॅमसनला का वगळले
सॅमसनला 4 वर्षानंतर खेळण्यासाठी फक्त 2 चेंडू देण्यात आले
आता पाणी कोण पाजणार
भारत टी -20 वर्ल्ड कप 2020 जिंकणार नाही याचे कारण...
दरम्यान, ब्लॅक कॅप्सविरुद्ध 5 टी-20 सामन्यातविराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करेल. 24 जानेवारीपासून टी -20 मालिकेसह हा दौरा सुरू होणार आहे. यानंतर केन विल्यमसनच्या संघाविरूद्ध भारत 3 एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या आठवड्यात श्रीलंकेविरूद्ध दोन टी-20 सामन्यात दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिखर धवनने स्थान कायम ठेवले. शिवाय, अष्टपैलू हार्दिक पंड्या ज्याचे टी-20 संघात पुनरागमन होणे अपेक्षित होते, त्याची शनिवारी मुंबईत फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर निवड झाली नाही.