IND vs NZ: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यावर Rahul Dravid यांनी पुन्हा पुनुरुजीवित केली जुनी परंपरा, MS Dhoni कर्णधार बनल्यावर झाली होती खंडित

तथापि टीम इंडियाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर द्रविडने खात्री केली आहे की युवा खेळाडूंना त्यांची पहिली कॅप माजी महान खेळाडूंकडून मिळेल जेणेकरून ते आयुष्यभर या क्षणाची कदर करतील.

राहुल द्रविड (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ: श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सुरु असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नाणेफेकपूर्वी माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याला टेस्ट कॅप देत संघात स्वागत केले. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची (Rahul Dravid) ही पहिलीच कसोटी मालिका आहे. रवि शास्त्री यांचा टीम इंडिया (Team India) सोबतचा प्रवासही टी-20 विश्वचषक सोबत संपुष्टात आला. त्यानंतर द्रविडने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. टीम इंडियात त्यांच्या एन्ट्रीने शास्त्री यांची संस्कृती संपत असल्याचे दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक द्रविडने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंकडून पदार्पण कॅप्स देण्याची जुनी परंपरा पुनरुज्जीवित केली. यापूर्वी, न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेदरम्यान द्रविडने माजी गोलंदाज अजित आगरकरला नवोदित हर्षल पटेलला त्याची पहिली कॅप देण्यासाठी आमंत्रित केले होते. (IND vs NZ 1st Test: चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर Shreyas Iyer बनला टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटर नंबर 303, दिग्गज क्रिकेटपटूने केले संघात स्वागत)

दिग्गज खेळाडूंकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना त्यांची पहिली कॅप मिळण्याची परंपरा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भूतकाळातील गोष्ट बनली आहे. अलीकडच्या काळात, पदार्पण करणाऱ्यांना संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एकाकडून किंवा प्रशिक्षक किंवा सपोर्ट स्टाफकडून त्यांची पहिली भारतीय कॅप मिळत होती. तथापि टीम इंडियाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर द्रविडने खात्री केली आहे की युवा खेळाडूंना त्यांची पहिली कॅप माजी महान खेळाडूंकडून मिळेल जेणेकरून ते आयुष्यभर या क्षणाची कदर करतील. ऑस्ट्रेलियासह जगभरातील ड्रेसिंग रूममध्ये ही परंपरा पाळली जाते. अशा परिस्थितीत महान कसोटी फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने आता ही परंपरा पुन्हा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आणली आहे.

उल्लेखनीय आहे की एमएस धोनी भारताचा कर्णधार बनल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये ही परंपरा खंडित झाली होती. त्याच्या कार्यकाळातच पहिली कसोटी किंवा ODI/T20I कॅप संघाच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक किंवा कर्णधार किंवा प्रशिक्षकाकडून दिली जात होती. धोनीनंतर कर्णधार बनलेल्या विराट कोहली धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत राहिला आणि जुनी परंपरा संपुष्टात आली. यापूर्वी साम्म्याच्या पहिल्या दिवशी, कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif