IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final सामन्यात पराभवानंतर रवींद्र जडेजा याने चाहत्यांचे आभार मनात केले भावुक Tweet
दरम्यान पराभवानंतर आज रविंद्र जडेजाने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. जडेजा याने भावुक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहे.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारताला (Indian Team) पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडन दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 221 धावांवर बाद झाला. भारतासाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) यांनी सर्वाधिक धावा केल्या. जडेजा आणि धोनी मैदानावर खेळात असताना सर्व चाहत्यांच्या आशा जिवंत होत्या. दोंघांनी सावध पण आक्रमक खेळी करत भारताचा डाव सावरला आणि संघाला विजयाच्या जवळ नेऊन पोहचवले. जडेजाने धोनीसोबत 100 धावांची भागिदारी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात जडेजा 77 धावांवर बाद झाला. (IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये 'सर रवींद्र जडेजा' विक्रमी कामगिरीची नोंद)
त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतरही सोशल मीडियावर जडेजाचे कौतुक होत आहे. दरम्यान पराभवानंतर आज रविंद्र जडेजाने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. जडेजा याने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहे आणि लिहिले, "कधीच हार मानू नये, पराभवनंतर कसं उभं रहायचे हे मला नेहमीच खेळानं शिकवलं आहे. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार".
दुसरीकडे, मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना न्यूझीलंड चा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने देखील जडेजाची कौतुक केले आहेत. यांच्या विश्वचषकमध्ये जडेजाला साखळी फेरीत फक्त एकच सामना खेळायला मिळाला होता. श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध सामन्यात जडेजाने 10 षटके टाकत 1 गडी बाद केला होता.