IND vs NZ ODI 2020: 31 वर्षानंतर टीम इंडियाचा वनडे मालिकेत क्लीन स्वीप, मॅच दरम्यान बनले 'हे' 10 प्रमुख रेकॉर्ड, वाचा सविस्तर

या पराभवामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली च्या नावावर एका लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली. भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर, केएल राहुलसह अनेक खेळाडूंनी इतिहास रचला. या जाणून घ्या

कॉलिन डी ग्रैंडहोम (Photo Credit: Twitter/ICC)

5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघाचा क्लीन स्वीप करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला. भारत आणि न्यूझीलंडमधील मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना माउंट माउंगानुई मध्ये खेळला गेला, ज्यात किवी संघाने 5 विकेट विजय मिळवला आणि भारताचा 3-0 ने क्लीन स्वीप केला. आता दोन्ही देशांमध्ये 2 सामन्यांची टेस्ट मालिका 21 फेब्रुवारीपासून खेळली जाईल. भारताने पाहिले फलंदाजी करत दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 47.1 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. किवी संघाने पहिले गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने शानदार कामगिरी बजावली आणि विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या नावावर एका लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली. शिवाय, भारत आणि न्यूझीलंडकडून अनुभवी खेळाडूंनीही प्रमुख विक्रमांची नोंद केली. (IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडने 5 विकेटने जिंकली तिसरी वनडे, टीम इंडियाचा 3-0 ने क्लीन स्वीप)

भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर, केएल राहुलसह अनेक खेळाडूंनी इतिहास रचला. या जाणून घ्या:

1. 31 वर्षांपूर्वी वनडे मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला असा अपमानजनक पराभव पत्करावा लागला होता. 1989 मध्ये मालिकेच्या सर्व सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजकडून भारताचा पराभव झाला होता. या दौर्‍यावर टीम इंडियाला एकही वनडे सामना जिंकता आला नाही.

2. यजमान संघाने घरच्या मैदानावर खेळत कोणत्याही टीमविरुद्ध वनडेमध्ये सहावा सर्वात मोठा क्लीन स्वीप केला आहे. 2018 मध्ये पाकिस्तानला न्यूझीलंडने 5-0 ने पराभूत केले होते. यापूर्वी 2017 आणि 2019 मध्ये किवी संघाने बांग्लादेशचा क्लीन स्वीप केले होता. 2018 मध्ये वेस्ट इंडीज, तर श्रीलंकेविरुद्ध2019 मध्ये 3- ने विजय मिळवला.

3. श्रेयस अय्यरने आज वनडे कारकिर्दीतील 9 वे अर्धशतक ठोकले. अय्यरने कमी सामन्यांत 50 किंवा अधिक धावा करण्यातसर्वाधिक सरासरीची नोंद केली. अय्यरने आता ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज इयान चॅपलचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चॅपेलने 16 सामन्यात सर्वाधिक 8 अर्धशतकी डाव खेळला होता, तर अय्यरने 16 सामन्यांत 9 अर्धशतकं झळकावत 41 वर्षीय जुना विक्रम मोडला.

4. भारताला वनडे मालिकेत तिसऱ्यांदा क्लीन स्वीप पत्करावा लागला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजने 2 वेळा भारताचा 5-0 ने क्लीन स्वीप केला होता.

5. या वनडे मालिकेत विराट कोहलीने 25 च्या सरासरीने फलंदाजी केली, 2015 पासून कोणत्याही वनडे मालिकेतील ही त्याची सर्वात वाईट सरासरी आहे.

6. 3 सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत भारताकडून लाठ्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध श्रेयसने सर्वाधिक 217 धावा केल्या. यापूर्वी, युवराज सिंहने इंग्लंडविरुद्ध 2017 मध्ये 210 धावा केल्या होत्या.

7. कॉलिन डी ग्रैंडहोम भारताविरुद्ध सर्वात कमी चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.ग्रैंडहोमने संयुक्तपणे 21 चेंडूत भारतविरुद्ध अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी झिम्बाब्वेचा डोगी मॅरिलियरने तितक्याच चेंडूत 2002 मध्ये अर्धशतक केले होते.

8. केएल राहुलने आज न्यूझीलंडविरुद्ध 112 धावांचा शानदार डाव खेळला आणि 1999 मध्ये श्रीलंकेविरूद्ध टॉनटॉन येथे झालेल्या विश्वचषकात राहुल द्रविडनन्तर आशियाबाहेर शतक ठोकणारा पहिला भारतीय विकेटकीपर ठरला. द्रविडने त्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 135 धावा केल्या होत्या आणि त्याने विकेटकिपिंग ही केली होती. वनडे सामन्यात एमएस धोनीने आशियाबाहेर एकही शतक केले नाही.

9. जानेवारी 2107 मध्ये कटक येथे इंग्लंडविरुद्ध धोनीच्या 134 धावांनंतर भारतीय फलंदाजाने पाचव्या स्थानावर फलंदाजीला येत केलेले हे पहिले वनडे शतक आहे.

10. न्यूझीलंडचा हा भारताविरुद्धचा 49 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकूण 109 सामने खेळले गेले होते. त्यापैकी 55 सामने भारताने, तर न्यूझीलंडने 48 सामने जिंकले. दोन सामने टाय आणि 5 सामने अनिर्णीत राहिले.

आजच्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली आणि मयंक अग्रवाल लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार विराट कोहली आणि पृथ्वी शॉ यांनाही मोठी खेळी करता आली नाही. राहुलच्या 112 आणि श्रेयसच्या 62 धावांच्या जोरावर भारतीय संघाने 296 धावांपर्यंत मजल मारली.