IND vs NZ: रोहित शर्मा,मोहम्मद शमी खेळणार न्यूझीलंड टी -२० मालिकेत; बीसीसीआयने टीम इंडिया संघाची केली घोषणा

हा त्यांचा यावर्षात पहिलाच परदेश दौरा असणार आहे. रविवारी या दौर्‍याचा संघ जाहीर करण्यात आला असून भारताने आपल्या संघात काही बदल केलेले दिसून आले.

बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

India T20I squad: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची न्यूझीलंड दौर्‍यावर जाण्यास सज्ज आहे. हा त्यांचा यावर्षात पहिलाच परदेश दौरा असणार आहे. रविवारी या दौर्‍याचा संघ जाहीर करण्यात आला असून भारताने आपल्या संघात काही बदल केलेले दिसून आले.  नुकत्याच संपलेल्या श्रीलंका टी -२० मालिकेमध्ये मर्यादित षटकांच्या सेटअपमध्ये जसप्रीत बुमराह आणि शिखर धवनची पुनरागमन झाले आणि दोघांनाही जानेवारीच्या न्यूझीलंड दौर्‍यासाठी स्थान देण्यात आले.

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा टी -२० संघात पुनरागमन करणार आहे, अशी घोषणा बीसीसीआयने रविवारी केली आहे. एएनआई ने त्यासंदर्भात एक ट्विट केले आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या टी -२० मालिकेमधून वगळलेल्या संजू सॅमसनच्या जागी रोहितला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहितने अखेर वेस्ट इंडीज विरुद्ध डिसेंबरमध्ये भारतकडून खेळला होता. तिथे तीन सामन्यांत 31.33 च्या सरासरीने आणि 151.61 च्या स्ट्राईक रेटने 94 धावा केल्या होत्या.

परंतु, श्रीलंकेसोबत झालेल्या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले.

पाच सदस्यीय निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध टी -२० मालिकेसाठी विश्रांती घेतलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हार्दिक पांड्या मात्र त्याचे पुनरागमन सध्यातरी करणार नाही.

दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी -20 मालिका 24 जानेवारीपासून ऑकलंडमध्ये सुरू होईल. भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

IND vs NZ: हार्दिक पांड्या संघाबाहेर; विजय शंकर याला मिळाली संधी

टी -२० संघ: विराट कोहली (सी), रोहित शर्मा (व्हीसी), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (डब्ल्यूके), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी , नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर