IND vs NZ 4th T20I: मनीष पांडे चे झुंजार अर्धशतक, टीम इंडियाचे न्यूझीलंडला 166 धावांचे लक्ष्य

टीम इंडियासाठी सलामी फलंदाज केएल राहुल याने 39 धावा केल्या. मनीष पांडे 50 धावा करून नाबाद परतला. मनीषने 36 चेंडूंचा समान करत मुश्किल स्थितीत 3 टी-20 अर्धशतक केले.

मनीष पांडे (Photo Credit: Twitter/ICC)

वेलिंग्टनच्या वेस्टपैक स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात यजमान संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन याच्या अनुपस्थितीत टिम साऊथी ने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) क्लीन-स्वीप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टीम इंडियाने (India) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 बाद 165 धावा केल्या आणि किवी संघाला विजयासाठी 166 धावांचे लक्ष दिले. आजच्या सामन्यात किवी गोलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. आजच्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने 39 धावा केल्या. मनीष पांडे (Manish Pandey) 50 धावा करून नाबाद परतला. मनीषने 36 चेंडूंचा समान करत मुश्किल स्थितीत 3 टी-20 अर्धशतक केले. दुसरीकडे, किवींकडून ईश सोढीने (Ish Sodhi) सर्वाधिक 3 गडी बाद केले. टिम साऊथी, स्कॉट कुग्गेलैन, मिशेल सेंटनर आणि हमीश बेनेट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs NZ 2020: जसप्रीत बुमराह ला गोलंदाजीचा सल्ला दिल्याने संजय मांजरेकर झाले ट्रोल, Netizens म्हणाले 'तुम्ही कोचसाठी अर्ज करा')

आजच्या सामन्यात रोहित शर्माला भारतीय संघाकडून विश्रांती देण्यात आली. रोहितच्या जागी राहुलसह संजू सॅमसन सलामीला आला. खराब शॉट खेळल्यानंतर संजू दुसर्‍या ओव्हरच्या तिसर्‍या चेंडूवर पॅव्हिलिअनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली डावाच्या 5 व्या ओव्हरमध्ये 9 चेंडूंत 11धावा केल्या आणि बेनेटच्या चेंडूवर मिशेल सॅंटनरकडे झेलबाद झाला. भारताला तिसरा धक्का श्रेयस अय्यरच्या रूपाने मिळाला, ज्याने 7 चेंडूत 1 धाव केली. राहुलने 26 चेंडूत 39 धावा केल्या आणि सोढीने त्याला सॅनरनेसॅंटनरकडे झेलबाद केले. शिवम दुबेने मोठा शॉट लावण्याच्या प्रयत्नात चौकार पकडला, पण 9 चेंडूंत 12 धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि बेनेटच्या चेंडूएवर साऊथीकडे झेलबाद झाला.

आजच्या सामन्यासाठी कोहलीने संघात 3 बदल केले आहेत. रोहितसह रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांची जागी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांनी संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या संघात दोन बदल झाले आहेत. टॉम ब्रूसला केन विल्यमसनच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे, तर डेरिल मिशेलला प्लेन इलेव्हनमध्ये कॉलिन डी ग्रैंडहोमची जागा देण्यात आली आहे. टीम इंडियाने मागील सामन्यात 3-0 ने मालिका खिशात घातली आहे.