IND vs NZ 4th T20I: न्यूझीलंडने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा घेतला निर्णय, टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये झाले 3 बदल
टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनच्या वेस्टपैक स्टेडियमवर चौथा टी-20 सामना खेळण्यास सज्ज आहे. सामना सुरु होण्यापूर्वी किवी कर्णधार टिम साउथी याने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना स्थान दिली आहे.
5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवल्यावर टीम इंडिया (India) आता न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध वेलिंग्टनच्या वेस्टपैक स्टेडियमवर चौथा टी-20 सामना खेळण्यास सज्ज आहे. सामना सुरु होण्यापूर्वी किवी कर्णधार टिम साउथी (Tim Southee) याने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसरा टी-20 सामना जिंकल्यावर विराटने म्हटले होते की उर्वरित दोन सामन्यांसाठी प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकते. त्याच्यावर अंमलबजावणी करत भारताने प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा (Rohit Sharma) , रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी संजू सॅमसन (Sanju Samson) , वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना स्थान दिली आहे. संजू केएल राहुलसह भारताच्या डावाची सुरुवात करेल. दुसरीकडे, सामन्यापूर्वीच किवी संघाला मोठा धक्का असला. कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी टिम साऊथी यजमान संघाचे नेतृत्व करणार आहे. विल्यमसनला दुखापत झाल्याने त्याच्याजागी डेरिल मिशेल आणि कॉलिन डी ग्रैंडहोमच्या जागी टॉम ब्रूसला स्थान मिळाले आहे.(IND vs NZ 2020: जसप्रीत बुमराह ला गोलंदाजीचा सल्ला दिल्याने संजय मांजरेकर झाले ट्रोल, Netizens म्हणाले 'तुम्ही कोचसाठी अर्ज करा')
या मालिकेत भारताने 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे आणि आता त्यांचे लक्ष क्लीन-स्वीप करण्यावर आहे. आजवर भारताने किवी देशांत खेळत एकही टी-20 मालिका जिंकली नव्हती, मात्र यंदा या टीम इंडियाने ते शक्य करून दाखवले. दुसरीकडे, किवी संघ मालिका गमावल्यानंतर उर्वरित सामन्यात विजय मिळवत घरच्या मैदानावरील प्रेक्षकांसमोर लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, यापूर्वी भारताने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले होते, परंतु तिसऱ्या सामन्यात किवी संघाने प्रभावी पुनरागमन केले. न्यूझीलंडकडून कर्णधार विल्यमसनने तुफानी 95 धावा फटकावल्या पण शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला आणि संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.
असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, टॉम ब्रुस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम साउथी (कॅप्टन), ईश सोधी, स्कॉट कुग्गेलैन, हमीश बेनेट.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)