IND vs NZ 3rd Test 2024: कसोटी सामने आणि मालिका गमावणे पचनी पडत नाही; रोहित शर्मा
भारताची आघाडी वजा करता न्यूझीलंडने 146 धावा केल्या आणि विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं. पण भारताचा डाव फक्त 121 धावांवर आटोपला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात 25 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होत आहे
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: रविवारी न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी 25 धावांनी गमावल्यानंतर आणि घरच्या मैदानावर प्रथमच 3-0 असा क्लीन स्वीप भोगल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, कसोटी सामना आणि मालिका गमावणे पचनी पडणार नाही.
रोहितने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही हे मान्य केले आणि न्यूझीलंडने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. आमच्याकडून खूप चुका झाल्या. पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही धावफलकावर धावा केल्या नाहीत आणि या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करता आला असता पण . (हेही वाचा - Rohit Sharma IND vs NZ: रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! न्यूझीलंडकडून मालिका पराभवानंतर आली ही नामुष्की )
फलंदाजीतील त्याच्या फ्लॉप कामगिरीबद्दल रोहित म्हणाला, "जेव्हा मी फलंदाजीला जातो, तेव्हा मी एका विशिष्ट विचाराने जातो, परंतु या मालिकेत मला कोणतेही परिणाम मिळाले नाहीत ज्यामुळे मी खूप निराश होतो."
पहिल्या डावात 28 धावांची आघाडी असूनही पराभवाची नामुष्की ओढावली. भारताची आघाडी वजा करता न्यूझीलंडने 146 धावा केल्या आणि विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं. पण भारताचा डाव फक्त 121 धावांवर आटोपला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात 25 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या पराभवानंतर रोहित शर्माने आपण निराश असल्याचे सांगितले. रोहित म्हणाला की “आम्ही गेल्या तीन चार वर्षात अशा खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत. आम्हाला कसं खेळायचं ते माहिती आहे. पण या मालिकेत तसं काही झालं नाही. ही मालिका गमवल्याचं दु:ख असणार आहे. मी फलंदाज आणि कर्णधार म्हणून या मालिकेत अपयशी ठरलो आहे. त्याचबरोबर आम्ही संघ म्हणून कामगिरी करण्यात अपयशी ठरलो.” , असं कर्णधार शर्मा याने मालिका गमावल्यानंतर सांगितलं.