IND vs NZ 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: नाबाद अर्धशतक झळकावत ऋषभ पंतने सावरला भारताचा डाव, टीम इंडियाला विजयासाठी अजूनही 55 धावांची आवश्यकता
न्यूझीलंडकडूनही सुरुवातीला शानदार गोलंदाजी ही करण्यात आली. एकवेळेस भारताची धावसंख्या ही 30 वर 5 बाद अशी झाली होती. यामुळे भारत हा सामना गमावणार का? अशी शंका देखील निर्माण झाली.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 59.4 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 44 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली होती. (हेही वाचा - IND vs NZ 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, विराट कोहली 1 धाव करून बाद; टीम इंडियाला विजयासाठी अजून 119 रन्सची आवश्यकता )
आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. भारताला विजयासाठी 147 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात रोहित शर्माने आक्रमक पद्धतीने सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण एक चुकीचा फटका मारताना तो बाद झाला. त्यांने 11 चेंडूत 11 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहली हा देखील एक धाव करुन बाद झाला, यानंतर यशस्वी आणि सरफराज देखील स्वस्तात लागोपाठ बाद झाले. पाचव्या विकेटसाठी जाडेजा आणि पंतने भारतासाठी चांगली भागिदारी रचली. परंतू एजाज पटेलने जाडेजाला बाद करत ही भागिदारी तोडली. जाडेजा बाद झाल्यानंतरही पंतने आपली शानदार कामगिरीही सुरुच ठेवली. लंचच्या पुर्वी पंतने आपले अर्धशतक साजरे केले, सध्या पंत हा 50 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 53 धावांवर खेळत आहे. तर त्याच्या सोबतीला सुंदर 6 धावांवर खेळत आहे. सध्या भारताची धावसंख्या 92 वर 6 अशी असून भारताला विजयासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडकडूनही सुरुवातीला शानदार गोलंदाजी ही करण्यात आली. एकवेळेस भारताची धावसंख्या ही 30 वर 5 बाद अशी झाली होती. यामुळे भारत हा सामना गमावणार का? अशी शंका देखील निर्माण झाली. पंरतू . न्यूझीलंडकडून एजाज पटेलने आतापर्यंत 4 विकेट मिळवल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2024 11:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

