Video: तिसऱ्या वनडे मॅचमध्ये धाव घेताना जेम्स नीशम ने अडवला केएल राहुल चा मार्ग, दोघांमध्ये रंगली मजेदार चर्चा
दरम्यान जेम्स नीशम आणि केएल राहुल यांच्यात मजेदार चर्चा पाहायला मिळाली. जेव्हा राहुल 20 धावांवर खेळत होता त्यावेळी त्याने जेम्स नीशमच्या चेंडूवर एकेरी धावण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा नीशम त्याच्या मार्गात उभा राहिला.
भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट टीममध्ये सध्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठी धावसंख्या बनविली. या दरम्यान जेम्स नीशम (James Neesham) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यात मजेदार चर्चा पाहायला मिळाली. वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना बे ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघाकडून केएल राहुल याने शानदार फलंदाजी केली आणि शतकी डाव खेळत 112 धावा फडकावल्या. सामन्यात जेव्हा तो 20 धावांवर खेळत होता त्यावेळी त्याने जेम्स नीशमच्या चेंडूवर एकेरी धावण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा नीशम त्याच्या मार्गात उभा राहिला. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत 297 धावांचे लक्ष्य उभारले. (IND vs NZ 3rd ODI: श्रेयस अय्यर याने इयान चॅपल यांना मागे टाकत नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, शतकवीर केएल राहुल ने न्यूझीलंडविरुद्ध रचला इतिहास)
राहुल आणि नीशममध्ये या प्रसंगानंतर वाद न होता मजेदार चर्चा पाहायला मिळाली. राहुल नीशमच्या जवळ आला आणि त्याला काहीतरी म्हणाला यांनतर नीशम काहीतरी म्हणाला ज्याच्या नंतर राहुलला हसू आले. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळताना दिसतील. राहुल यंदा संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळेल. पाहा हा व्हिडिओ:
राहुलशिवाय तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने 62 धावांची चांगली खेळी खेळली. राहुलने 112 धावा केल्या. मनीष पांडेने त्याला चांगली साथ दिली आणि 42 धावांची शानदार खेळी साकारली. यामुळे भारतीय संघाने 50 षटकांत 29 गडी गमावून 296 धावा केल्या आहेत. राहुलचे यंदाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरील हे पहिले वनडे शतक आहे. यापूर्वी, पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक केले पण दुसऱ्या सामन्यात त्याला चांगला खेळ करता आला नाही. हमीश बेनेटने 4 तर कायल जैमीसनने 1 गडी बाद केला. प्रथम फलंदाजीत उतरल्यानंतर, भारताला दुसऱ्याच ओव्हरमध्ये धक्का बसला. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मयंक अग्रवाल चा वाईट फॉर्म सुरु राहिला आणि तो 1 धावांवर रवाना झाला. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला. मात्र, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने दुर्दैवी धावचीत होण्याआधी 42 चेंडूत 40 धावा करून डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला.