IND vs NZ 2nd Test: रवींद्र जडेजा ने न्यूझीलंडच्या नील वॅग्नर ला आऊट करण्यासाठी पकडला '2020 चा सर्वोत्कृष्ट कॅच', पाहा Video

जडेजाने हवेत उडी मारून एका हाताने एक शानदार कॅच पकडला, जो या वर्षाचा सर्वोत्तम झेल मानला जाऊ शकतो.

रवींद्र जडेजाचा शानदार झेल (Photo Credits: @MickRandallHS /Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी रविंद्र जडेजा ने मैदानात थक्क करणारा झेल पकडला. जडेजाने हवेत झेप घेतली आणि एक शानदार कॅच पकडला. जडेजा सध्या जगातील सर्वात हुशार क्षेत्ररंपैकी एक असल्याचे पुन्हा एकदा या झेलने सिद्ध झाले. भारतीय संघासाठी प्रत्येक सामन्यात त्याचे क्षेत्ररक्षण निर्णायक ठरते. या सामन्यातही भारतीय संघाला विकेट मिळत नसताना जडेजाने अर्ध-संधीचे विकेटमध्ये रुपांतर करून भारताला यश मिळवून दिले. कॉलिन डी ग्रैंडहोमला बाद करून जडेजाने न्यूझीलंडची स्थिती 8 बाद 177 अशी केली. नील वॅग्नर फलंदाजीला येण्यापूर्वी भारताने चांगली आघाडी मिळवली होती. त्याने काईल जैमीसनसह नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. (IND vs NZ 2nd Test Day 2: भारताची घातक गोलंदाजी; न्यूझीलंड 235 धावांवर ऑलआऊट, भारताकडे 7 धावांची आघाडी)

भारताच्या गोलंदाजांनी सर्व काही करून पाहिले, परंतु जैमीसन आणि वॅग्नरसमोर ते निरुत्तर दिसले. न्यूझीलंड हळूहळू भारताच्या पहिल्या डावातील धावा जवळ पोहचत असताना वॅग्नरने मोहम्मद शमीच्या शॉर्ट बॉलवर हवेत शॉट मारला. वॅग्नरने स्क्वेअर लेगवर शॉट मारला, पण तेथे उभ्या असलेल्या जडेजाने हवेत उडी मारली आणि बॉल सीमारेषे पार जाऊ दिला नाही. जडेजाने हवेत उडी मारून एका हाताने एक शानदार कॅच पकडला, जो या वर्षाचा सर्वोत्तम झेल मानला जाऊ शकतो. पाहा व्हिडिओ:

भारत-न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी किवी संघाने 63/0 च्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडने पहिल्या सत्रात पाच विकेट गमावल्या. आणि चहाच्या वेळेपर्यंत भारतीय गोलंदाजांनी त्यांना 235 धावांवर ऑलआऊट केले आणि पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारताला 7 धावांची आघाडी मिळवून दिली. भारताकडूनमोहम्मद शमी (Mohammed Shami) 4, जसप्रीत बुमराह 3, रवींद्र जडेजा 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला.दुसरीकडे, न्यूझीलंडच्या टॉम लाथम (Tom Latham) ने 52, काईल जैमीसन (Kyle Jamieson) 49 आणि टॉम ब्लेंडल (Tom Blundell) 30 धावा केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif